शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

६३ फूट उंच मंदिराच्या कळसाच्या जागी शिवलिंग; १२ ज्योर्तिलिंगाचे एकाच ठिकाणी होते दर्शन

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 12, 2024 13:13 IST

महाराष्ट्रात महादेवाचे असंख्य मंदिर आहेत. मात्र, संपूर्ण मंदिरालाच शिवलिंगाचे रुप दिलेले ‘इलोडगड’ तील १२ ज्योर्तिलिंग शिवालय एकमेव ठरत आहे.

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ६३ फूट उंच महाशिवलिंगाचा आकार मंदिर तुम्हाला दिसले तर आणि त्या खाली एकाच ठिकाणी १२ ज्योर्तिलिंगाचे दर्शन घडले तर... हे काही स्वप्न नाही... सूर्या इतके सत्य आहे. तेही आपल्या वेरूळ घृष्णेश्वर मंदिरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘इलोडगड’ येथे. श्रावण सोमवार हे महाराष्ट्रातील असे एकमेव महादेव मंदिर बघण्यासाठी भाविकांची झुंबड उडत आहे.

महाराष्ट्रात महादेवाचे असंख्य मंदिर आहेत. मात्र, संपूर्ण मंदिरालाच शिवलिंगाचे रुप दिलेले ‘इलोडगड’ तील १२ ज्योर्तिलिंग शिवालय एकमेव ठरत आहे. त्यामुळेच अल्पावधीत या मंदिर शिवभक्तांमध्ये एवढे प्रसिद्ध झाले की, मुंबईहूनही भाविक येथे दर्शनासाठी येत आहे. तसेच घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनाला येणार भाविकही आर्वजून हे मंदिर ‘याचि देही याची डोळा’ बघण्यासाठी येत आहेत.

मंदिराच्या कळसाच्या जागी शिवलिंग१२ ज्योर्तिलिंग शिवालयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यास कळस नाही. कळसाच्या जागेवर शिवलिंग तयार करण्यात आले आहे. त्याचा आकार ३६ फूट उंच आहे आणि जलधारा १०८ फूट लांबीची आहे. खाली मंदिराच्या गाभाऱ्यात १२ ज्योर्तिलिंगाची अर्धेचंद्रकोर आकारात मांंडणी केली आहे. सर्व शिवलिंग मध्यप्रदेशातील उज्जैन महाकालेश्वर येथून आणण्यात आले आहे. मध्यभागी ‘सोमनाथ’ ज्योर्तिलिंग आहे. या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा महाशिवरात्रीला २०२१ मध्ये करण्यात आली.

भगवान विश्वकर्माचे प्रगट स्थान१२ ज्योर्तिलिंग शिवालयाच्या बाजूला आणखी एक भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. हा परिसर भगवान विश्वकर्माचे प्रगट स्थान म्हटल्या जाते. म्हणून तिथे भगवान विश्वकर्माची मूर्ती स्थापित केली आहे.

इलोडगड येथील मंदिराचे वैशिष्ट्य१) ६३ फूट उंच शिवलिंगाचा आकारातील मंदिर.२) ३६ फूट उंच शिवलिंगच मंदिराचा कळस३) १०८ फूट लांबीची जलधारी४) १२ ज्योर्तिलिंगाचे एकच ठिकाणी दर्शन५) ७ एक मंदिराचा परिसर६) १५ वर्षे लागले हे मंदिर बनवायला

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShravan Specialश्रावण स्पेशलAjantha - Elloraअजंठा वेरूळ