शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी कर्जाचा विळखा; मराठवाड्यात ८ महिन्यांत ६२६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:10 IST

पीककर्ज वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज काढून शेतीमध्ये गुंतवणूक केली. त्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले

औरंगाबाद : मराठवाड्यात आठ महिन्यांत ६२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यातील बहुतांश आत्महत्या सावकारी कर्जाच्या जाचामुळे झाल्याचे बोलले जात आहे. तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया जात आहे. यंदाही तशीच अवस्था असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सावकारी कर्जासह इतर अनेक बाबीही शेतकरी आत्महत्येस कारणीभूत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १०९, जालना ७७, परभणी ५०, हिंगोली २४, नांदेड ८९, बीड १७०, लातूर ३६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ७१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मागील दोन महिन्यांत १०० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. पीककर्ज वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज काढून शेतीमध्ये गुंतवणूक केली. त्यातही अतिवृष्टीमुळे विभागातील सुमारे ८ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अस्मानी संकटाचा सामना करण्यासह बँकांकडूनही शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्यामुळे शेतकरी नैराश्येच्या गर्तेत जात आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी उभारी २.० हा उपक्रम राबवित आहेत.

सरकारची भूमिका काय ?३१ जुलै रोजी मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्या दिवशी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चिंता व्यक्त केली होती. याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचेही जाहीर केले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल.

विभागात फक्त ६३ टक्के पीककर्ज वाटपमराठवाड्यात आजवर ६३ टक्के शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप झाले आहे, तर दुसरीकडे ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अद्याप ३७ टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. पेरण्या मात्र पूर्ण झाल्या असून ज्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज दिले नाही, त्यांनी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरण्या केल्याचे यातून दिसते आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबाद