शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

‘समृद्धी’ला लागणार ६०० कोटी लिटर पाणी; कंत्राटदारानेच पाण्याचे नियोजन करण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:32 IST

७० टक्के दुष्काळ असलेल्या भागातून जाणार मार्ग

ठळक मुद्देमहामार्गाच्या बांधकामासाठी २८ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. पाण्यामुळे कामास विलंब झाला तर दंड लागणार नाही.

- विकास राऊत 

औरंगाबाद : मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवे अर्थात समृद्धी महामार्गाच्या बांधणीला  तब्बल ६०० कोटी लिटर पाणी लागणार असून त्याची उपलब्धता संबंधित कंत्राटदाराला करावी लागणार आहे.

पाणी मिळण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनादेखीलसंपर्क केला असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी मंगळवारी येथे पत्रकार  परिषदेत दिली. ७० टक्के दुष्काळ असलेल्या भागातून महामार्ग बांधणीचे काम सुरू असून, या भागात पाणी नाही. असे असताना पाण्याविना काम थांबले तर कंत्राटदाराला दंड लावणार काय? यावर सहव्यवस्थापकीय संचालक गायकवाड म्हणाले, पाण्यामुळे कामास विलंब झाला तर दंड लागणार नाही. मात्र इतर कारणांमुळे जर कामाला विलंब झाला तर ०.०५ टक्के दंड कंत्राटदाराला आकारण्यात येईल. तसेच निर्धारित डेडलाईनपूर्वी काम केले तर ०.०३ टक्के बोनस कंत्राटदाराला देण्यात येईल. आजवर कुणालाही दंड आकारलेला नाही. समृद्धी महामार्ग ७०१ कि़ मी. लांबीचा असून, १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर ७ ते ८ तासांवर येणार आहे. 

एका हंगामासाठी ९०० हेक्टरला पुरेल पाणी समृद्धीच्या बांधणीला लागणारे ६०० कोटी लिटर पाणी ९०० हेक्टर जमिनीला एका हंगामासाठी पुरू शकेल. महामार्ग बांधणीला मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. ६ दशलक्ष घनमीटर इतके पाणी लागणार आहे. जवळपास एक पाझर तलाव भरूनच हे पाणी लागणार आहे. पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे यांनी सांगितले.

भूसंपादनासह ८ हजार कोटीभूसंपादनासह ८ हजार कोटी लागले आहेत. त्यात १६२७ कोटी कंत्राटदारावर आणि ईपीसी कन्सल्टंटवर व ६५०० कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च झाले आहेत. भूसंपादनाचा मुद्दा आता संपला आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावे, गंगापूरमधील ११ गावांतील व वैजापूरमधील १५ गावांतील जमीन महामार्गासाठी संपादित केली आहे. जालना जिल्ह्यातील २५ गावांतील भूसंपादन झाले आहे. 

भूमिपूजन निश्चित नाहीमाईलस्टोनच्या पुढे महामार्गाचे काम सुरू झाले असले तरी भूमिपूजन अजून निश्चित झालेले नाही. भूमिपूजनाच्या तारखेबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही, असे सहव्यवस्थापकीय संचालक गायकवाड यांनी सांगितले. १६ पॅकेजस्मध्ये महामार्गाचे काम होणार असून ८, ९ आणि १० हे तीन पॅकेज औरंगाबाद-जालन्यातील आहेत. ८ व १० पॅकेजचे काम वेगाने सुरू आहे. पॅकेज क्र.९ उशिरा सुरू झाले आहे.

२८ हजार कोटींचे कर्जमहामार्गाच्या बांधकामासाठी २८ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे. २७ हजार कोटींची इक्विटी आहे, तर ६ हजार ३९६ कोटी रुपये सरकारी वाटा असणार आहे. ५५ हजार कोटींचा हा प्रकल्प असून, जुलै २०२१ पर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, असा दावा गायकवाड यांनी केला. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादWaterपाणीdroughtदुष्काळ