जिल्ह्यातील ६०० डॉक्टर जाणार दिल्लीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:40 IST2017-11-02T00:40:12+5:302017-11-02T00:40:16+5:30
आयुर्वेद, युनानी, सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘निमा’ने प्रस्तावित एनसीआयएसएम विधेयकाविरुद्ध ६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे़ त्यानिमित्त दिल्ली येथे होणाºया मोर्चाला नांदेडातून ६०० डॉक्टर जाणार आहेत़

जिल्ह्यातील ६०० डॉक्टर जाणार दिल्लीला
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : आयुर्वेद, युनानी, सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘निमा’ने प्रस्तावित एनसीआयएसएम विधेयकाविरुद्ध ६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे़ त्यानिमित्त दिल्ली येथे होणाºया मोर्चाला नांदेडातून ६०० डॉक्टर जाणार आहेत़
एनसीआयएसएम या कायद्यामुळे डॉक्टरांचे भवितव्य धोक्यात येणार आहे़ नीती आयोगाद्वारे एनसीआयएसएम हा कायदा आणण्यात येवू नये असे डॉक्टरांचे म्हणणे आहे़ त्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे़, अशी माहिती निमाचे सचिव डॉ़अविनाश वडजे यांनी दिली़ या संपादरम्यान, केंद्र सरकारकडे अन्य मागण्याही नमूद करण्यात येणार आहेत़ त्यात ४७ वर्षांपासून प्रचलित कायदा रद्द करण्यात येवू नये, भारतीय चिकित्सा पद्धती ही राष्ट्रीय चिकित्सा पद्धती म्हणून घोषित करावी, भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे़
त्यासाठी नांदेड शहर व जिल्ह्यातील डॉक्टरांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहन निमाचे अध्यक्ष डॉ़ डी़ लक्ष्मण, डॉ़जवादुल्लाखान, डॉ़विजयकुमार सुर्वे, डॉ़संजय भक्कड, डॉ़श्रीराम कल्याणकर, डॉ़ बंग, डॉ़ इंगळे यांनी केले आहे़