शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

डेल्टा प्लसचा ६० वर्षीय रुग्ण ठणठणीत; महिनाभरापूर्वी घेतला कोरोनावर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 18:46 IST

Delta Plus Corona patient in Aurangabad : या रुग्णास सध्या कोणतीही लक्षणे नसून प्रकृती चांगली आहे.

ठळक मुद्देरुग्ण सिडको वाळूज महानगरातील रहिवासी आरोग्य पथक पोहोचले तेव्हा ते दुकानातील कामात व्यस्त

औरंगाबाद : औरंगाबादेत डेल्टा प्लस व्हेरिएंटने शिरकाव केल्याने सोमवारी एकच खळबळ उडवली. आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर या रुग्णाचा शोध घेतला. तेव्हा डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण हा ६० वर्षीय असून, तो सिडको वाळूज महानगर-१ येथील रहिवासी असल्याचे समोर आले. आरोग्य पथकाने तत्काळ तिकडे धाव घेतली, तेव्हा सदर रुग्ण आपल्या इलेक्ट्रिक दुकानात नियमित कामकाज करण्यात व्यस्त होते. रुग्णाची प्रकृती ठणठणीत असल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.

सदर रुग्णाच्या घरी ‘आयडीएसपी’ आणि दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने सोमवारी भेट दिली. या रुग्णास सध्या कोणतीही लक्षणे नसून प्रकृती चांगली आहे. रुग्णाने अजूनपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एकही डोस घेतलेला नाही. या रुग्णांची २ जुलै रोजी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल ३ जुलै रोजी पाॅझिटिव्ह आला होता. यानंतर रुग्णाने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. पाच दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती चांगली झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. फाॅलोअपसाठी गेल्यानंतर इतर त्रासामुळे रुग्णाला नाॅन कोविड वाॅर्डात भरती करण्यात आले होते. तेव्हाही तब्येतीत सुधारणा झाल्याने पाच दिवसांनंतर सुटी देण्यात आली. ३ जुलै रोजी पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा स्वॅब नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाला.

रुग्णाच्या वसाहतीचे सर्वेक्षणरुग्ण राहात असलेल्या परिसरात आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रुग्णाच्या घरातील सर्व सदस्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्याची सूचना करण्यात आली. त्याबरोबरच परिसरातील सर्वेक्षणात जर कोणी संशयीत अथवा सारीचे रुग्ण आढळले तर त्यांचीही आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे.

रुग्णाची प्रकृती चांगलीडेल्टा प्लसच्या रुग्णाची प्रकृती चांगली आहे. त्याला सध्या कोणतीही लक्षणे नाहीत. परिसरात पथकातर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयीत रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येईल.- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद