६० टक्के नागरिकांनी दाखल केले आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:02 IST2017-07-26T01:02:10+5:302017-07-26T01:02:57+5:30
परभणी : वाढीव घरपट्टीच्या अनुषंगाने शहरातील मालमत्ताधारकांना महापालिकेने नोटीस दिल्या आहेत. आतापर्यंत वाटप झालेल्या नोटिसीपैकी सुमारे ६० टक्के नागरिकांनी या नोटिसांवर आक्षेप नोंदवत कर वाढीलाच विरोध केला आहे.

६० टक्के नागरिकांनी दाखल केले आक्षेप
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वाढीव घरपट्टीच्या अनुषंगाने शहरातील मालमत्ताधारकांना महापालिकेने नोटीस दिल्या आहेत. आतापर्यंत वाटप झालेल्या नोटिसीपैकी सुमारे ६० टक्के नागरिकांनी या नोटिसांवर आक्षेप नोंदवत कर वाढीलाच विरोध केला आहे.
परभणी शहरातील मालमत्ताधारकांकडून महापालिका घरपट्टी वसूल करते. प्रत्येक १५ वर्षानंतर मालमत्तांचे पूनर्मूल्यांकन करणे अपेक्षित असते. परंतु, परभणी शहरात हे मूल्यांकन झाले नसल्याने महापालिकेला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. दरम्यान, मागील वर्षी महानगरपालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण आणि फेरमूल्यांकन पूर्ण केले आहे. या फेरमूल्यांकनाच्या आधारे शहरातील मालमत्ताधारकांना नवीन करानुसार घरपट्टी दिली जात असून त्यात वाढीव बांधकामाचीही नोंद केली जात आहे. घरपट्टी दिल्यानंतर प्रत्येक मालमत्ताधारकाला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जात आहे. परभणी शहरामध्ये ४५ हजार मालमत्ता असून आतापर्यंत सुमारे १२ हजार २२८ नागरिकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी जवळपास सुमारे ३ ते ४ हजार नागरिकांनी महापालिकेकडे आक्षेप नोंदविले आहेत. महापालिकेने बजावलेली घरपट्टी मान्य नसल्याचे या नागरिकांनी मनपाला कळविले आहे. दरम्यान, या सर्व नागरिकांचे आक्षेप नोंद केले जात असून त्यांची प्रत्यक्ष सुनावणी घेतली जाणार आहे.
शहरामध्ये तीन प्रभाग समितीनिहाय नागरिकांना नोटीस बजावल्या आहेत. आतापर्यंत प्रभाग समिती अ मध्ये ५ हजार, ब मध्ये ४ हजार २२८ तर क मध्ये ३ हजार नागरिकांना अशा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेने लावलेला कर हा पूर्वीच्या कराच्या तुलनेत अधिक असल्यामुळे आक्षेप नोंदविणाºयांची संख्याही वाढली आहे. ३ हजार आक्षेप महापालिकेकडे दाखल झाले असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.