औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये यासह अनेक ठिकाणी तिरंगा फडकावून हा दिवस साजरा केला जातो. मात्र, तब्बल २२ टक्के नागरिक कुठल्याही झेंडावंदनाला उपस्थित राहत नसल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. हे नागरिक एकतर घरातच आराम करतात किंवा सुटीचा आनंद घेण्यासाठी बाहेरगावी जातात.
६० टक्के नागरिक आपल्या कार्यालयात, एखाद्या शासकीय कार्यालयात किंवा मुलाच्या शाळेत झेंडावंदनाला उपस्थित राहतात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ने वकील, व्यापारी, शिक्षक, युवावर्ग, महिला, कर्मचारी, व्यावसायिक अशा सर्वच क्षेत्रांतील नागरिकांचे सर्वेक्षण केले.
यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ज्या घरात लहान मुले आहेत तेथे झेंडावंदनाची जय्यत तयारी चालते. लहानांसोबत घरातील ज्येष्ठदेखील उपस्थित राहतात. १८ टक्के नागरिक झेंडावंदनाला जातात; पण यात नियमितता नसते. इच्छा असूनही जाऊ शकत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. मुलांना आणि पतीला जायचे म्हटल्यावर त्यांच्या तयारीतच वेळ निघून जातो, अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.
झेंडावंदन कुठे?
घराजवळ असलेल्या कार्यालयात, शाळा किंवा महाविद्यालयात झेंडावंदनाला उपस्थिती लावली जाते.
सुटीचे प्लॅनिंग
यावर्षीचा स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आला असल्याने युवकांनी सलग तीन दिवसांच्या सुटीचे प्लॅनिंग केले आहे़ या तीन दिवसांत आऊंटिंग, ट्रेकिंग, तसेच लाँग टूरला जाणार असल्याचे युवकांनी सांगितले.
नोकरदार वर्गाने आराम करण्यालाच पसंती दिली़ गेट टूगेदर, मित्र भेटीचे नियोजन आखल्याचे काहींनी सांगितले.
सेवेत असतानाच झेंडावंदन
वेळेअभावी किंवा कामाच्या ताणामुळे आता नियमितपणे जाणे होत नाही़ गेल्या काही वर्षांपासून तर गेलो नसल्याचे अनेकांनी सांगितले.
६० टक्के नागरिकांचे झेंडावंदन
By admin | Updated: August 15, 2014 01:13 IST
औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनी तब्बल २२ टक्के नागरिक कुठल्याही झेंडावंदनाला उपस्थित राहत नसल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
६० टक्के नागरिकांचे झेंडावंदन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}