एसटीचे दगडफेकीत ६ लाखांचे नुकसान

By Admin | Updated: June 25, 2014 01:03 IST2014-06-25T00:02:25+5:302014-06-25T01:03:43+5:30

बीड: आंदोलन कशाचेही असो. कोणतीही घटना असो... प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसरात्र धावणाऱ्या एसटीवर दगडफेक झालीच म्हणून समजा.

6 million losses in ST | एसटीचे दगडफेकीत ६ लाखांचे नुकसान

एसटीचे दगडफेकीत ६ लाखांचे नुकसान

बीड: आंदोलन कशाचेही असो. कोणतीही घटना असो... प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसरात्र धावणाऱ्या एसटीवर दगडफेक झालीच म्हणून समजा. मागील पंधरवाड्यात झालेल्या तीन विविध घटनांमध्ये समाजाच्या दुखावलेल्या भावनांमुळे एसटीला तब्बल सहा लाखांचा फटका बसला आहे. मागील नऊ दिवसात सोशल मीडियावर महापुरूषांची विटंबना व इतर कारणांमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली.
गोरगरीबांसाठी हक्काची गाडी आणि प्रवाशांच्या सेवेसाठी ‘रस्ता तेथे एसटी’ हे ब्रीद वाक्य घेऊन धावणारी एसटी प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखली जाते.
प्रवासासाठी एसटीलाच पहिली पसंती मिळते. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी असणारी ही बस मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न असो अथवा महापुरूषांच्या विटंबनेचे प्रकार असो किंवा राजकीय मुद्यांवरून पेटणारे आंदोलने असो, सर्वत्रच बसला टार्गेट करण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू आहे.
दगडफेक जाळपोळ यामुळे महामंडळाचे मोठे नुकसान होते. शिवाय बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होतात. (प्रतिनिधी)
पंधरा दिवसांत ३० बस फोडल्या
सोशल मीडियावर महापुरूषांची विटंबना करण्यात आली. समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने काही कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या तसेच काही बसगाड्या जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. या ३१ मे ते ९ जून या नऊ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात नऊ बसगाड्यांचा चुरा करण्यात आला. यामध्ये सहा लाख सहा हजारांचे नुकसान झाले, असल्याचे वाहतूक पर्यवेक्षक बाबा गर्कळ यांनी सांगितले.

Web Title: 6 million losses in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.