जिल्ह्यातील ५९ प्रकल्प कोरडे
By Admin | Updated: August 18, 2015 00:52 IST2015-08-18T00:46:29+5:302015-08-18T00:52:29+5:30
उस्मानाबाद : पावसाळा सुरू होवून अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे लघू व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले असून

जिल्ह्यातील ५९ प्रकल्प कोरडे
उस्मानाबाद : पावसाळा सुरू होवून अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे लघू व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले असून, जिल्ह्याच्या अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत ५९ प्रकल्प करोडेठाक पडले आहे. लहान व मोठ्या प्रकल्पात मिळून केवळ २.४७ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.
मागील तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे़ त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ जिल्ह्यात तीन मोठे १७ मध्यम व १९३ लघू प्रकल्प आहेत़ सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये काही दिवसांपुरताच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. सद्यस्थितीत उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा, रुई, कळंब तालुक्यातील रायगव्हाण, परंडा तालुक्यातील खासापूर, चांदणी, खंडेश्र्वर व साकत असे सात मध्यमप्रकल्प भर पावसाळयात ही कोरडे पडले आहेत. तर भूम तालुक्यातील रामगंगा मध्यम प्रकल्पात अवघा ०.०१८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ६८ लघु प्रकल्प पैकी ३५ प्रकल्पात पाण्याचा थेंब ही नाही. यात उस्मानाबाद तालुक्यातील २१, कळंब ५, भूम १, वाशी ३ तर परंडा तालुक्यातील ५ असे ३५ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील राघुचीवाडी लघु प्रकल्पात ०.०६६ पाणी साठा, पोहनेर ०.०१७, कळंब तालुक्यातील येमरमाळा ०.०४४, चोराखळी ०.२६२, भूम तालुक्यातील कुंथलगिरी प्रकल्पात ०.०३१, आरसोली १.१५६, नांदगांव ०.५००, वाशी तालुक्यातील इ-याचीवाडी ०.०२९ उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ६८ लघुप्रकल्पात केवळ १.७५२ उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. (प्रतिनिधी)
मागील आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील १०५ गावांना १४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. शिवाय विविध गावांत ८७७ स्त्रोतांचे अधिग्रहणेही करण्यात आली होती. मागील आठ दिवसांत ही संख्या वाढली असून, सद्यस्थितीत ११७ गावे व एका वाडीवर १५६ टँकर तर ९०२ स्त्रतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सर्वाधिक ३८ टँकर उस्मानाबाद तालुक्यात असून, यामार्फत २७ गावांची तहान भागविली जात आहे. याशिवाय तुळजापूर नऊ गावांसाठी १२, उमरगा १० गावांना १४, लोहारा २ गावांसाठी ७, कळंब २९ गावांना ३७, भूम २७ गावांसाठी ३३, वाशी ८ गावांसाठी ९ तर परंडा तालुक्यात पाच गावांसाठी सहा टँकरद्वार पाणीपुरवठा करण्यात येत आहे.