सामुदायिक सोहळ्यात ५१ जोडपी होणार विवाहबद्ध
By Admin | Updated: April 25, 2016 23:28 IST2016-04-25T23:19:26+5:302016-04-25T23:28:54+5:30
उस्मानाबाद : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत २७ एप्रिल रोजी उस्मानाबाद येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा होणार असून,

सामुदायिक सोहळ्यात ५१ जोडपी होणार विवाहबद्ध
उस्मानाबाद : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत २७ एप्रिल रोजी उस्मानाबाद येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा होणार असून, यात ५१ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.
सोहळ्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या मैदानात जय्यत तयारी करण्यात येत असून, यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळी उपस्थित राहणार आहेत. नववधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांसाठी तीन हजार चौरस फुटांचे व्यासपीठ उभारण्यात आले असून, वऱ्हाडी मंडळींसाठी पन्नास हजार चौरस फुटाचा शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे. सोहळा यशस्वी करण्यासाठी विविध समित्या कार्यान्वित करण्यात आल्या असून, वधू-वरांसाठी देण्यात येणारे विविध साहित्य आठ दिवसांपूर्वीच वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी दिली. वधू-वरांच्या निवासाची व्यवस्था अण्णा ई-टेक्नोच्या इमारतीमध्ये करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.