शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात ५ हजार मालमत्ता जमिनदोस्त; आता बाधितांना मनपा टीडीआर कसा देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:36 IST

बाजारात सध्या टीडीआरची मागणी तर अगदीच नगण्य

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने नवीन विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. बाधित मालमत्ताधारकांना रोख मोबदला देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत. टीडीआर हाच एकमेव पर्याय आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये बाजारात टीडीआरची मागणी जवळपास घटली आहे. छोट्या-मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना १०० टक्के टीडीआर वापरणे बंधनकारक केले तरच टीडीआरला आणि बाधित मालमत्ताधारकांना चांगले दिवस येतील.

महापालिकेने मागील १५ वर्षांमध्ये जुन्या विकास आराखड्यानुसार मोठ्या प्रमाणात टीडीआर दिले. बांधकाम व्यावसायिकांनी चढ्या दराने हे टीडीआरही घेतले. अनेक प्रकरणांमध्ये मूळ जमीनमालकापेक्षा टीडीआरची खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांची चांदी झाली. २०२० पासून टीडीआरची मागणीही हळूहळू घटली. कारण राज्य शासनाने एकीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियम (यूडीसीपीआर)ची अंमलबजावणी सुरू केली. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहराला १.१ एफएसआय मंजूर आहे. मोठी उंच इमारत बांधायची असेल तर टीडीआरऐवजी बांधकाम व्यावसायिक रहिवासी इमारतीसाठी ०.६ आणि व्यावसायिक इमारतीसाठी ०.८ ॲन्सलरीचा वापर करू लागले. बांधकाम व्यावसायिक टीडीआरच्या भानगडीत न पडला ॲन्सलरीचा वापर करू लागले. बाजारात टीडीआरचे दर गडगडले. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी मागील वर्षीच बांधकाम व्यावसायिकांना ४० टक्के टीडीआर वापरणे आणि ६० टक्के ॲन्सलरीचा वापर करणे बंधनकारक केले. त्यामुळे टीडीआरचा बाजार जिवंत राहिला.

रोख किंवा टीडीआर हे दोनच पर्यायमहापालिकेने आतापर्यंत ७ रस्ते रुंद केले. पाच हजारांहून अधिक अनधिकृत बांधकाम केलेल्या मालमत्ता जमीनदोस्त केल्या. मालमत्ताधारकांच्या मालकी हक्काच्या जमिनी ताब्यात घेणे मनपासाठी सोपे नाही. जागेचा मोबदला दिल्याशिवाय मालमत्ताधारक एक इंचही जागा देणार नाहीत. मोबदला द्यायचा म्हटले तर रोख किंवा टीडीआर हे दोनच पर्याय मनपाकडे आहेत. त्यात बाजारात टीडीआरला फारशी किंमत नसेल तर मालमत्ताधारक पुढे येणार नाहीत. त्यामुळे मनपाला बांधकाम व्यावसायिकांना टीडीआर वापरणे बंधनकारक करावे लागणार असल्याचे ज्येष्ठ वास्तुविशारदाने सांगितले.

मोबदला देण्यावर प्रशासक ठाममनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी रविवारी स्मार्ट सिटीच्या बैठकीत हर्सूल येथील मालमत्ताधारकांना मोबदला देण्याचे आश्वासन दिले. रोख, टीडीआर देणार असे सांगितले. मोबदला दिल्याशिवाय जागा ताब्यात घेणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमण