शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कपिलधार यात्रेसाठी ५०० पोलीस

By admin | Updated: November 4, 2014 01:38 IST

बीड : तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथील यात्रेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे़ आठ लाख भाविकांची यात्रेला उपस्थिती असणार आहे़ तीन दिवस चालणारा महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी

बीड : तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथील यात्रेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे़ आठ लाख भाविकांची यात्रेला उपस्थिती असणार आहे़ तीन दिवस चालणारा महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़ सोमवारी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी कपिलधार येथे सुरक्षेचा आढावा घेतला़ राज्यभरातून ४५ पेक्षा जास्त दिंड्या बुधवारी श्री मन्मथस्वामी यांच्या पावनभूमीत आगमन करणार आहेत़ आंध्रप्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून भाविक कपिलधार येथे श्री मन्मथस्वामींच्या दर्शनासाठी येतात़ सोमवारपासून भाविकांची गर्दी वाढू लागली आहे़ पुढील दोन दिवसात येथे आठ लाख भाविक येणार असल्याचे येथील शिवशंकर महाराज चौंडे यांनी सांगितले़ आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पाचशेच्यावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत़ कपिलधार क्षेत्रावर जाण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग आहेत़ एक मार्ग बीडकडून तर दुसरा मांजरसुबामार्गे आहे़ यामुळे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या मार्गावर बंदोबस्त ठेवलेला आहे़ येथील सुरक्षेचा आढावा अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी घेतला़ यावेळी पोलिस उपअधीक्षक ए़ पी़ कराडे, अभय डोंगरे, सहायक निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांची उपस्थिती होती़ वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या भाविकांना रांगेत मन्मथस्वामींच्या समाधीचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेसाठी बॅरिकेटस् उभारले आहेत़ महिलांसाठी वेगळी रांग करण्यात येत आहे़ आलेल्या प्रत्येक भाविकाला स्वामींचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीच्या सर्व सदस्यांबरोबरच संयोजन समितीने योग्य ती काळजी घेतलेली आहे़ याशिवाय मंदिर परिसरातील स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे़ ठिकठिकाणी गर्दी होऊन चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी पोलिस व संस्थांचे स्वंयसेवकांनी नियोजन केले आहे़रिंगण सोहळा ठरणार मुख्य आकर्षणवेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या दिंड्या मांजरसुंबा मार्गावरून कपिलधार येथे बुधवारपर्यंत दाखल होत आहेत़ या दिंड्यांचा रिंगण सोहळा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार असून हा सोहळा यात्रेच्या प्रारंभीच होणार असल्याचे संयोजन समितीतील सदस्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)