शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यात ५०० जणांनी काढले बँक खाते

By admin | Updated: August 31, 2014 01:10 IST

उदगीर/जळकोट : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या जन-धन योजनेला गुरुवारी जळकोटमधून प्रारंभ करण्यात आला़

उदगीर/जळकोट : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या जन-धन योजनेला गुरुवारी जळकोटमधून प्रारंभ करण्यात आला़ येथील हैद्राबाद बँकेने शिबीर घेऊन २२० आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचे विनाशुल्क खाते उघडले़जळकोटमध्ये बँकिंग व्यवहाराशी जोडणाऱ्या जन-धन योजनेला प्रारंभ करण्यात आला़ येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेने यासंदर्भात शिबीर घेतले़ अध्यक्षस्थानी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रामराव सोनटक्के होते़ व्यवस्थापक भुजंगराव पाटील, उपव्यवस्थापक पियुष, प्रवीण गवरे, अजय मंडल, गोपालराव, मनोज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती़ या योजनेंतर्गत आधार कार्डावर विनाशुल्क तीन मिनिटात खाते उघडणे, खातेदारास डेबिट कार्ड, १ लाख रुपयांचा अपघात विमा, एटीएम, मोबाईलवर बँकिंग सेवा असे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले़ २२० सर्वसामान्यांचे खाते शिवराज तर्केवाड, सोपान आद्रटकर, लक्ष्मण गायकवाड, सारिका पवार, माधव पवार, मारोती गायकवाड यांनी काढून दिले़(वार्ताहर)डोंगरशेळकी जन-धन योजनेंतर्गत युनियन बँक आॅफ इंडियाने उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकीत शिबीर घेतले़ याठिकाणी एकाच दिवसात २५० बचत खाते उघडण्यात आले़ खातेधारकांना लगेचच शाखा व्यवस्थापक सुनिल कुमार, चंद्रशेखर, केशवराव मुंडे यांच्या हस्ते पासबुक व डेबिट कार्डाचे वितरण करण्यात आले़उदगीर येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेने तीन दिवसांत उदगीर शहरातील ५०० नागरिकांचे खाते उघडून दिले़ खातेधारकांना वार्ड क्रमांक ३ मध्ये जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्या हस्ते पासबुक वितरीत करण्यात आले़ यावेळी गटविकास अधिकारी डी़बी़ गिरी, मुख्य व्यवस्थापक रविंद्र कोथळीकर, प्रमोद निनावे, जयंत डांगे, नगरसेवक साबेर पटेल, राहूल अंबेसंगे, किशोर कांबळे, वसंत म्हेत्रे यांची उपस्थिती होती़