शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने मृत्यूचे तांडव; काका, पुतणीसह गर्भातील बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:40 IST

तिघांच्या मृत्यूला चालकाचा बेजबाबदारपणा कारण; वेगवान कारचे सिसिटीव्ही फुटेज पाहून पोलिसही हबकले

छत्रपती संभाजीनगर : मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री भरधाव आलिशान कारने रिक्षाला पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत काका, पुतणीसह जखमी गरोदर मातेचे गर्भातील बाळही दगावले. हा अपघात करणारा बेजबाबदार चालक कश्यप विनोद पटेल (वय ३३, रा. कुशलनगर) याने आकाशवाणी चौक ते मोंढा नाका उड्डाणपूल हे अर्धा किलोमीटर अंतर अवघ्या १८ सेकंदांत वाऱ्याच्या वेगाने पार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले. कारचा हा वेग पाहून क्षणभर पोलिसही हबकले.

अब्दुल्ला अबित अब्दुल्ला मुजीब हे २० डिसेंबर रोजी रात्री ९:१५ वाजता मावशी अजराबानू जेधपूरवाला, मावशीचा मुलगा अख्तर रजा, अहमद रजा, मुली उजमा बानो व जेबा बानो, सून अलिझा, नात जोहरा व तीन बालके सिडको कामगार चौकाजवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर अहमद रजा आणि त्याची बहीण जेबा बानो हे दोघे स्कूटीवर, तर उर्वरित सर्वजण मोहंमद बारी यांच्या रिक्षाने जुना बाजारातील घराकडे निघाले होते. अहमद रजा यांची दुचाकी पुढे, तर रिक्षा मागे होती. मोंढा नाका उड्डाणपुलावरून जाताना मागून कारने रिक्षाला धडक दिली. रिक्षातील अख्तर रजा उंच उडून उड्डाणपुलावरून थेट खाली रस्त्यावर कोसळले. दुचाकीवरील अहमद रजा यांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, अख्तर आणि जोहरा यांचा मृत्यू झाला; तर अलिझा ही सात महिन्यांची गर्भवती होती. तिच्या पोटातील बाळही दगावले.

प्लायवूडचा व्यवसायकश्यपचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. अपघातानंतर त्याने जखमींना मदत करण्याऐवजी कारमधील तीन मुलींसह पळ काढला. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी चालक कश्यप विनोद पटेल (३३, रा. कुशलनगर) याला अटक करून २१ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्याला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी उपनिरीक्षक खिल्लारे यांनी पुन्हा त्याला न्यायालयात नेले असता २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी वाढली.

English
हिंदी सारांश
Web Title : Speeding Car Kills Three in Chhatrapati Sambhajinagar Accident

Web Summary : A speeding car in Chhatrapati Sambhajinagar killed an uncle, niece, and unborn child. The reckless driver covered half a kilometer in 18 seconds. After dinner, a speeding car hit their rickshaw, killing two instantly and unborn child.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी