शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या डोक्यात वृद्धावस्थेत संशयाचा भुंगा; ५० वर्षीय पत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 12:00 IST

चारित्र्यावर संशय ठरला घातक; प्रेमविवाह केलेल्या पतीने वृद्धावस्थेकडे झुकल्यानंतर संशयावरून खून केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद : दारू पिऊन ५० वर्षांच्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेणाऱ्या पतीने घरातील दगडी खलबत्त्याने पत्नीच्या डोक्याचा चेंदामेदा केल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता राहुलनगर येथे उघडकीस आली. खून केल्यानंतर पती मृतदेहाशेजारीच मोबाइल ठेवून फरार झाला. त्याच्या शोधासाठी सातारा ठाण्याचे दोन, गुन्हे शाखेचे एक पथक तैनात केले आहे.

बिलकीस उर्फ मीना (५०) असे मृत महिलेचे आणि आरोपी पतीचे मच्छिंद्र पिराजी पिटेकर (५५, रा.राहुलनगर) नाव आहे. सातारा पोलीस ठाण्यात मीनाची मुलगी शमा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मच्छिंद्रला दारूचे प्रचंड व्यसन आहे. दारू पिऊन तो सतत पत्नीस शिवीगाळ व मारहाण करीत होता. शनिवारी रात्रीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. शमा यांनी वडिलांना समजावून सांगितल्यानंतर, त्या घरी निघून गेल्या. बिलकीस या मुलगी शमासह एका हॉटेलवर कामाला होत्या. सकाळी शमा यांनी कामावर जाण्यास निघाल्यानंतर, आईच्या घराचे गेट उघडून आत पाहिले असता, घराला कुलूप होते. तेव्हा त्यांना आई आपल्या अगोदर कामाला गेली असल्याचे वाटले.  हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिलकीस दिसल्या नाहीत. त्यामुळे शमा यांनी स्वत:ची मुलगी मुस्कानला पाठविले. मुस्कानने घरी जाऊन कुलूप तोडून पाहिले असता, बिलकीस रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास उपनिरीक्षक सर्जेराव सानप करीत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळीशहरात मध्यरात्रीच खुनाची एक घटना समोर आली होती. सकाळी ८ वाजता दुसरी घटना समोर आल्यामुळे उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे, निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक देविदास शेवाळे, सर्जेराव सानप आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे पथकही दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला.

बिलकीस यांचा दुसरा विवाहबिलकीस यांचा मच्छिंद्र पिटेकर हा दुसरा पती आहे. बिलकीस यांना दोन विवाहित मुली, एक मुलगा आहे. मुलगा हा नगर येथे मजुरीचे काम करतो. बिलकीस आणि तिचा दुसरा पतीही मोलमजुरी करत होते. प्रेमविवाह केलेल्या पतीने वृद्धावस्थेकडे झुकल्यानंतर संशयावरून खून केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू