५० टक्के विद्यार्थी ‘आधार’विना

By Admin | Updated: May 11, 2015 00:31 IST2015-05-11T00:25:44+5:302015-05-11T00:31:05+5:30

उसमानाबाद : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आधारकार्ड नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. यापूर्वी १ लाख ५४ हजार ७५४ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्यात आली आहे.

50 percent of students without 'foundation' | ५० टक्के विद्यार्थी ‘आधार’विना

५० टक्के विद्यार्थी ‘आधार’विना


उसमानाबाद : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आधारकार्ड नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. यापूर्वी १ लाख ५४ हजार ७५४ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी १ लाखावर विद्यार्थ्यांची नोंदणी करणे बाकी आहे.
जिल्हा परिषद शाळांतर्गत सुमारे २ लाख ६० हजार २४८ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात ४९ हजार ६९१, तुळाजपूर ५५ हजार ६१०, उमरगा ४६ हजार ८७१, लोहारा १९ हजार ३१७, कळंब २९ हजार ३८६, वाशी १४ हजार १२३, भूम २१ हजार ५६२ आणि परंडा तालुक्यातील २३ हजार ६८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदरील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणीसंदर्भात शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. यापूर्वी १ लाख ५४ हजार ७५४ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्यात आले आहे. यामध्ये तुळजापूर तालुका आघाडीवर आहे. पन्नास टक्क्यांवर म्हणजेच ३१ हजार ६३३ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर उस्मानाबाद तालुक्यातील ३० हजार ९६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून उमरगा तालुक्यातील २८ हजार ७४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कळंब तालुक्यातून १८ हजार ५९, भूम १६ हजार ६४३, लोहारा ११ हजार ५९७, परंडा ११ हजार १७६ आणि वाशी तालुक्यातील ६ हजार २८४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणीसाठी आता शिक्षण विभागाकडून विशेष मोहित हाती घेण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 50 percent of students without 'foundation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.