शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मराठवाड्यातील ५० टक्के शहरांवर जलसंकट गडद; पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणार

By विकास राऊत | Updated: December 27, 2023 15:13 IST

बहुतांश शहरांना आगामी चार महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सरत्या वर्षात कमी पाऊस झाल्यामुळे ७६ पैकी ३८ शहरांवर फेब्रुवारी-मार्च २०२४ नंतर पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होणार आहे. विभागीय प्रशासनाने याबाबत चाचपणी केली असून, शासनाला याबाबतची माहिती अहवालानुसार कळविली आहे. बहुतांश शहरांना आगामी चार महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे.

जून २०२४ पर्यंत १९ शहरांना तर ८ शहरांना जुलै २०२४ अखेरपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. ६ शहरांना एप्रिल-मे अखेरपर्यंत, १२ शहरांना मार्च अखेरपर्यंतच पाणीपुरवठा होऊ शकेल. फेब्रुवारी २०२४ पर्यंत १९ शहरांना पाणी देता येणार आहे. तर ४ शहरांना जानेवारीअखेरनंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. दोन शहरांचे स्त्रोत आटले आहेत. ६ शहरांना येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा होईल.

१ कोटी लोकांची तहान कशी भागणार?२०११च्या जनगणनेनुसार मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख असून, यातील सुमारे ७६ लाख लोकसंख्या शहरी भागात २०११ नुसार आहे. परंतु सध्या लोकसंख्या २ कोटींच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. शहरी लोकसंख्येचा टक्का ५० टक्के असणे, शक्य असून सुमारे १ कोटीहून अधिक लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणाऱ्या उन्हाळ्यात भेडसावेल.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय शहरे.......किती दिवस पाणी पुरणारछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर.........वर्षभर पुरेलवैजापूर..........जानेवारी २०२४सिल्लोड------जून २०२४पैठण---------जून २०२४कन्नड--------जानेवारी २०२४गंगापूर..............फेब्रुवारी २०२४खुलताबाद..........मार्च २०२४फुलंब्री..............फेब्रुवारी २०२४सोयंगाव..............एप्रिल २०२४

जालना जिल्हाजालना शहर..........सध्या पाणीसाठा आहेअंबड.................एप्रिल २०२४परतूर................ मार्च २०२४भोकरदन...........जलस्त्रोतांमध्ये पाणी नाहीबदनापूर.............मार्च २०२४घनसावंगी..........फेब्रुवारी २०२४जाफ्राबाद............फेब्रुवारी २०२४मंठा.................फेब्रुवारी २०२४तीर्थपुरी............मार्च २०२४

परभणी जिल्हा...................मानवत.........मार्च २०२४पाथरी.............फेब्रुवारी २०२४सेलू..............फेब्रुवारी २०२४पालम............फेब्रुवारी २०२४पूर्णा..................फेब्रुवारी २०२४सोनपेठ...........फेब्रुवारी २०२४जिंतूर.................फेब्रुवारी २०२४गंगाखेड..............फेब्रुवारी २०२४

हिंगोली जिल्हा...............हिंगोली..............जुलै २०२४वसमत.............जुलै २०२४कळमनुरी............जुन २०२४औंढा नागनाथ...........जुन २०२४सेनगाव...............जुन २०२४

नांदेड जिल्हा..................कंधार...................जुलै २०२४कुंडलवाडी............जुलै २०२४किनवट.............जुलै २०२४देगलूर...............नोव्हेंबर २०२४धर्माबाद..............जुलै २०२४बिलोली..................मे २०२४लोहा..............फेब्रुवारी २०२४उमरी...............मार्च २०२४हदगाव.............पाण्याचा स्त्रोत नाहीभोकर...........जून २०२४मुखेड................जून २०२४मुदखेड............नोव्हेंबर २०२४अर्धापूर.........जून २०२४माहूर.................मार्च २०२४हिमायतबाग.........जून २०२४नायगाव...............जून २०२४

बीड जिल्हा............................बीड..................फेब्रुवारी २०२४अंबाजोगाई...........जून २०२४परळी...................जून २०२४गेवराई...................जून २०२४माजलगाव...............फेब्रुवारी २०२४धारूर.................जुलै २०२४केज................जुलै २०२४आष्टी.............जुलै २०२४पाटोदा...............एप्रिल २०२४शिरूरकासार............जानेवारी २०२४वडवणी..............मे २०२४

लातूर जिल्हा........................उदगीर.......................जून २०२४अहमदपूर..................जून २०२४निलंगा.......................जून २०२४औसा....................जून २०२४चाकूर....................जून २०२४शिरूरअनंतपाळ..........मार्च २०२४देवणी.......................मार्च २०२४जळकोट................मार्च २०२४रेणापूर................मार्च २०२४

धाराशिव जिल्हा.............धाराशिव................मे २०२४तुळजापूर.................जून २०२४नळदुर्ग..................जून २०२४उमरगा................जून २०२४मुरूम..................फेब्रुवारी २०२४कळंब................मार्च २०२४भूम..................जानेवारी २०२४परंडा.................फेब्रुवारी २०२४वाशी....................फेब्रुवारी २०२४लोहारा..............फेब्रुवारी २०२४

सरते वर्ष कमी पावसाचेमराठवाड्यात यंदा १५ टक्के कमी पाऊस झाला. नांदेड, हिंगोली वगळता कुठेही समाधानकारक पाऊस नाही. अवकाळी पावसाने डिसेंबरमध्ये हजेरी लावली. त्याचा फारसा परिणाम जलसाठा होण्यावर झाला नाही. मोठ्या ११ जलप्रकल्पांसह मध्यम व लघु ८६६ प्रकल्प, बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या शहर, गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

योजनांवर निर्णयच होत नाही...मराठवाडा वॉटरग्रीडवर निर्णय होत नाही. सरकार चर्चेला वेळ देत नाही. नवीन योजनांचा विचार नाही. कमी पाऊस पडल्याने ३७ टक्केच जलसाठा प्रकल्पांमध्ये आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात शहरांसह ग्रामीण भागात पाणीटंचाई भीषण असणार आहे.-डॉ.शंकर नागरे, माजी सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी