१३ पैकी ५ डॉक्टरच हजर

By Admin | Updated: June 8, 2014 00:54 IST2014-06-08T00:48:16+5:302014-06-08T00:54:26+5:30

किनवट : गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त असलेल्या डॉक्टरांपैकी मोजकेच डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांना सेवा देत असल्याने डॉक्टरांच्या वाढलेल्या दांड्यांची तक्रार

5 out of 13 doctors attended | १३ पैकी ५ डॉक्टरच हजर

१३ पैकी ५ डॉक्टरच हजर

किनवट : गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त असलेल्या डॉक्टरांपैकी मोजकेच डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांना सेवा देत असल्याने डॉक्टरांच्या वाढलेल्या दांड्यांची तक्रार आपण आरोग्यमंत्र्यांकडेच करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड यांनी दिली. ७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता दिलेल्या भेटीत मस्टरवरील तेरा पैकी केवळ पाचच डॉक्टर हजर होते.
जिल्ह्यापासून दीडशे कि.मी. अंतरावर किनवट आदिवासी तालुक्यात गोकुंदा येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित आहे. स्व. खा. उत्तमराव राठोड यांच्या संकल्पनेतून हे रुग्णालय येथे निर्माण झाले. मात्र रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढतच चालल्या आहेत.
७ जून रोजी मनोहर खिसले या सामाजिक कार्यकर्त्याने दवाखान्यात डॉक्टरच नाहीत. रुग्णांची हेळसांड पाहून नांदेड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड यांना या विषयीची माहिती दिली. त्यांनी गोकुंदाचे उपसरपंच प्रवीण मॅकलवार यांना सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालय गाठले तेव्हा मस्टरवर असलेल्या १३ डॉक्टरपैकी केवळ पाचच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती प्रकाश राठोड यांनी देत जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या डॉक्टरांची तक्रार आ. प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांकडे करुन कार्यवाहीची मागणी करु, असे राठोड यांनी सांगितले.
दरम्यान, गैरहजर डॉक्टरांबाबत विचारले असता डॉ. डी. जे. राठोड हे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर इतरत्र आहेत. डॉ. मालेटवार व डॉ. मडावी हे सतत गैरहजर आहेत तर डॉ. एस.जी. पल्लेवाड, डॉ. मसारे व डॉ. वाघमारे हे तिघे आज गैरहजर होते. डॉ. एम.एन. राठोड, डॉ. पोहरे, डॉ. आर.एस. लोंढे व डॉ. भागवत हे चार वैद्यकीय अधिकारी रजेवर आहेत. डॉ. धुमाळे यांनी डीएमओची रातपाळी ड्युटी केली तर वैद्यकीय अधीक्षक चौकशीकामी माहूरला गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दवाखान्याच्या वेळेत डॉक्टर उपस्थित राहत नाहीत. मस्टरवर नावे असणारे डॉक्टराचा आकडा मोठा असला तरी दररोज चार- पाचच डॉक्टर हजर असतात. कधी कधी तर डॉक्टरच नसतात? अशा तक्रारी आहेत. सध्या उन्हाळा असल्याने तापाच्या आजारात वाढ झाली. मलेरिया पॉझिटिव्ह रुग्णही आढळले. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने दक्ष राहायला हवे असताना पूर्णच्या पूर्ण डॉक्टर ओपीडीच्या वेळात हजर राहत नसल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा वेळेवर मिळत नसल्याची ओरड रुग्ण व त्यांचे नातेवाईक करतात. परिचारिकेचा अभाव असून रुग्णकल्याण समितीस बजेट नाही. त्यामुळे एका डॉक्टराचा पगार तीन महिन्यांपासून रखडला आहे तर डिझेललाही पैसे नसल्याने रेफर व्हावे लागणाऱ्या बीपीएलच्या रुग्णांनाही डिझेलसाठी पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप आहे. आदिवासी तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी नियुक्त डॉक्टरांनी कर्तव्यात कसूर न करता कर्तव्य बजवावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
विद्युत रोहित्रातील तार केली लंपास
किनवट : तालुक्यातील सोमठाणा शिवारातील विद्युत रोहित्रातील ३२ हजार रुपयांची तार लांबविण्यात आल्याची घटना ५ जून रोजी मध्यरात्री घडली. सोमठाणा शिवारात २५ के.व्ही. क्षमतेचे रोहित्र आहे. या रोहित्रातील ३२ हजार रुपयांची तांब्याची तार लांबविण्यात आली. चोरट्यांनी विद्युत रोहित्र खाली पाडून त्याची नासधूस करुन त्यातील आॅईल सांडून टाकले. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता विनायक दिग्रसकर यांनी फिर्याद दिली. पोलिसांनीे याप्रकरणीे गुन्हा नोंदविला आहे. (वार्ताहर)

जि.प. उपाध्यक्षांनी दिली भेट
७ जून रोजी मनोहर खिसले या सामाजिक कार्यकर्त्याने दवाखान्यात डॉक्टरच नाहीत. रुग्णांची हेळसांड पाहून नांदेड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड यांना या विषयीची माहिती दिली. त्यांनी गोकुंदाचे उपसरपंच प्रवीण मॅकलवार यांना सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालय गाठले तेव्हा मस्टरवर असलेल्या १३ डॉक्टरपैकी केवळ पाचच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती प्रकाश राठोड यांनी देत जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या डॉक्टरांची तक्रार आ. प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांकडे करुन कार्यवाहीची मागणी करु, असे राठोड यांनी सांगितले.

Web Title: 5 out of 13 doctors attended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.