५ लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:24 IST2017-08-27T00:24:28+5:302017-08-27T00:24:47+5:30
घराला कुलूप बघून चोरट्यांनी संधी साधली आणि सुमारे ५ लाखांची घरफोडी केल्याची घटना विद्यानगरातील प्राध्यापक कॉलनीत २५ आॅगस्ट रोजी रात्री घडली.

५ लाखांची घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
धर्माबाद : घराला कुलूप बघून चोरट्यांनी संधी साधली आणि सुमारे ५ लाखांची घरफोडी केल्याची घटना विद्यानगरातील प्राध्यापक कॉलनीत २५ आॅगस्ट रोजी रात्री घडली.
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.गोविंद मिरकुटे यांची विद्यानगरात दोन मजली इमारत असून वरच्या मजल्यावर पायोनियर कंपनीचे व्यवस्थापक नितीन वसंतराव वसमतकर भाड्याने राहतात. २४ आॅगस्ट रोजी वसमतकर कुटुंबीय ‘श्री’ स्थापनेनिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. चोरट्यांनी २५ आॅगस्टच्या रात्री घराचे कुलूप तोडून कपाटातील सोने चांदी, रोेख तीन लाख रुपये असा एकूण ४ लाख ९२ हजार ४५० रुपयांचा ऐवज लांबविला. २६ आॅगस्ट रोजी सकाळी औरंगाबादहून परत आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात येताच वसमतकर यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच श्वानपथकालाही पाचारण केले. पथकप्रमुख पो.नि. पाल, पो.कॉ. मुल्लमवार, शावण ब्राउनी, धमार्बादचे पोलीस निरीक्षक अंगद सुड़के, स.पो.नि. मल्हार सिवरकर, पो.हे.कॉ. बोधणे, पो.ना. रवी लोहाळे, शेषराव कदम, शेख गफारही पोहोचले. रात्री पाऊस पडल्याने श्वानपथकास कोणताही सुगावा काढता आला नाही.