पाच लाखांसाठी विवाहितेचा जाच

By Admin | Updated: June 1, 2014 00:27 IST2014-06-01T00:00:01+5:302014-06-01T00:27:06+5:30

उस्मानाबाद : माहेरहून पाच लाख रुपये घेवून ये म्हणून बाभळगाव येथील विवाहितेचा जाच केल्याप्रकरणी लातूर येथील सात जणाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

5 lakh for marriage | पाच लाखांसाठी विवाहितेचा जाच

पाच लाखांसाठी विवाहितेचा जाच

 उस्मानाबाद : माहेरहून पाच लाख रुपये घेवून ये म्हणून बाभळगाव येथील विवाहितेचा जाच केल्याप्रकरणी लातूर येथील सात जणाविरूध्द कळंब न्यायालयाच्या आदेशावरून येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी सांगितले की, बाभळगाव (ताक़ळंब) येथील विवाहिता सुषमा सुरज राऊत हिस पती सुरज राऊत याच्यासह आशाबाई शिवाजी राऊत, शशीकांत शिवाजी राऊत, नागेश्वरी राऊत, नारायण शिंदे, महादेव शिंदे, प्रभावती शिंदे (सर्व रा़ वैभवनगर लातूर) यांनी संगणमत करून विवाहितेस ‘तू काळी आहेस, आम्हाला पसंत नाहीस, नांदायचे असेल तर वडिलांकडून पाच लाख रूपये घेवून ये’ असे म्हणून शारीरिक, मानसिक जाच केला़ या प्रकरणी विवाहिता सुषमा हिने कळंब न्यायालयात फिर्याद दिली होती़ या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून सासरच्या सात जणांविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि अहंकारे हे करीत आहेत़ दोघांवर कारवाई उस्मानाबाद : नळदुर्ग वसंतनगर तांडा व पाटोदा येथे अवैधरीत्या दारूविक्री करणार्‍या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली़ ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून, यावेळी ७४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग वसंतनगर तांडा येथे अवैध दारूविक्री करणार्‍या तंगी एम़ कोळीविरूध्द नळदुर्ग पोलिसांनी कारवाई केली़ या कारवाईत ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ तर बेंबळी पोलिसांनी पाटोदा येथे दारूविक्री करणार्‍या जिजाबाई तात्याराव केदार या महिलेविरूध्द कारवाई केली़ या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 5 lakh for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.