शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या किलोमीटरवर ४९ खड्डे

By admin | Updated: February 1, 2015 00:45 IST

गजेंद्र देशमुख ,जालना अग्रसेन चौक ते बसस्थानक अशा साडेपाचशे मीटर रस्त्यावर तब्बल ४९ खड्डे असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आली.

गजेंद्र देशमुख ,जालनाअग्रसेन चौक ते बसस्थानक अशा साडेपाचशे मीटर रस्त्यावर तब्बल ४९ खड्डे असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आली. शहरात प्रवेश करण्याचा हा मार्ग खड्ड्यांनी आपले स्वागत करतो. जून २०१४ मध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. शनिवारी या रस्त्याचा आॅन द स्पॉट पंचनामा करण्यात आला. रस्त्याची स्थिती बिकट तर आहेच पण दोन्ही बाजूंनी तब्बल लहान मोठे मिळून ४९ खड्डे आढळून आले. नव्या रस्त्याला ठिगळ लावण्याची वेळ पालिकेवर आली आहे. त्यालाही मुहूर्त मिळालेला दिसत नाही. सहा महिन्यापूर्वी म्हणजेच पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. ६८ लाख ८४ हजार ५०० रुपयांचे हे काम आनंद कन्स्ट्रक्शन या कंपनीने केले आहे. केवळ सहा महिन्यात रस्ता उघडा पडल्याने या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनाचे नुकसान तर आहेच शिवाय पाठ तसेच कंबरेचे विकार वाढल्याचे नागरिक पोटतिडकीने सांगतात.याविषयी नगर पालिकेचे शहर अभियंता सय्यद सऊद म्हणाले, या रस्त्याच्या कामाविषयी आनंद कन्स्ट्रक्शनला सूचना देण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात या रस्त्याचे काम नव्याने सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वाधिक वर्दळीचा रस्ता !४ हा रस्ता शहरात सर्वाधिक वर्दळीचा आहे. दररोज ८० ते ९० बसेस याच मार्गावरुन धावतात. त्याचबरोबर ट्रक, कार, इतर वाहने तसेच दुचाकी मिळून हजारो वाहने रस्त्यावरुन धावतात. रस्त्याचे काम मलमपट्टीसारखेच झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम अत्यंत बोगस झाले आहे. सहा महिन्यांत रस्ते धोकादायक बनले आहेत. डांबरीकरण किरकोळ झाल्याने वाहन चालविणे कठीण जात आहे. - शेख अमजद दाऊद खानसहा महिन्यांत पुन्हा नव्याने रस्ता करावा लागत आहे. हे जालनेकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. कंत्राटदारांनी पुन्हा नव्याने रस्ता अथवा डागडुजी करुन करताना काळजी घ्यायला हवी. - दीपक दहेकरअग्रसेन चौकातच मोठे खड्डे आहेत. काम अत्यंत निकृष्ट करण्यात आले आहे. साहित्यही निकषाप्रमाणे वापरण्यात आलेले नाही. डागडुजी न झाल्यास पावसाळ्यात संपूर्ण डांबर वाहून जाणार आहे. -शेख वसिम शेख सरदारसंबंधित कंत्राटदाराने रस्त्याची डागडुजी करावी. पावसाळ्याच्या तोंडावर हे काम झाले आहे. अवकाळी पावसामुळेही डांबर निघाले आहे. वाहनचालकांचे गैरसोय लक्षात घेता रस्ता तात्काळ दुरुस्त करावा.- शेख अफसर