नऊ महिन्यांत ४८४ आत्महत्या; कारणे अनेक; पण कुटुंबियांची साथ, समुपदेशन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 07:25 PM2020-10-27T19:25:29+5:302020-10-27T19:35:20+5:30

आत्महत्येचे मूळ कारण शेवटी निराशाच असते. बहुतांश प्रकरणात तसेच दिसते.

484 suicides in nine months in Aurangabad | नऊ महिन्यांत ४८४ आत्महत्या; कारणे अनेक; पण कुटुंबियांची साथ, समुपदेशन गरजेचे

नऊ महिन्यांत ४८४ आत्महत्या; कारणे अनेक; पण कुटुंबियांची साथ, समुपदेशन गरजेचे

googlenewsNext

- योगेश पायघन
औरंगाबाद : गेल्या नऊ महिन्यांच्या काळात ४८४ जणांनी आत्महत्या केली. यामध्ये विषारी द्रव घेऊन १९९, गळफास घेऊन २२४, तर जाळून घेत ६१ जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रामुख्याने ऑगस्टमध्ये गळफासाच्या घटना वाढल्याचे दिसते. आत्महत्येचे मूळ कारण शेवटी निराशाच असते. बहुतांश प्रकरणात तसेच दिसते.  तज्ज्ञांकडून समुपदेशन, उपचार गरजेचा आहे, असा सल्ला घाटीचे मनोविकृती विभागाचे प्रमुख डाॅ. प्रदीप देशमुख यांनी दिला आहे.

लाॅकडाऊन काळात घटली होती संख्या
जानेवारी ३१, फेब्रुवारी १८, मार्चमध्ये २३, एप्रिल ९, मे १६, जून ३५, जुलै २२, ऑगस्ट ४१, अशा १९५ गळाफासाच्या घटनांची शवविच्छेदनगृहात नोंद आहे. जळीत रुग्णांची व जळून मृत्यूची, विषारी औषध प्राशनाने मृत्यू संख्या लाॅकडाऊन काळात घटली होती. मात्र, ही संख्या ऑगस्टनंतर वाढताना दिसत असल्याचे घाटीचे उपाधिष्ठाता व न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डाॅ. कैलास झिने यांनी लोकमतला सांगितले.

अनलॉकमध्ये आत्महत्येचे प्रयत्न करणारे दीडपट वाढले
लाॅकडाऊन काळात आत्महत्येचा प्रयत्न करणारे समुपदेशनासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अनलाॅकनंतर वाढलेले आहे. आठवड्यात किमान १५ पेशंट येत होते. हे प्रमाण लाॅकडाऊनपूर्वी १०, तर लाॅकडाऊनमध्ये २ ते ३ रुग्ण समुपदेशनासाठी घाटीत येत होते. याला कारणे अनेक असू शकतात. आता आत्महत्येचे प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण दीड टक्का वाढलेले दिसत आहे. अनेक प्रकरणात नोकऱ्यांवर गंडांतर, आर्थिक अडचणी, व्यसने आणि कोरोनासोबत नैसर्गिक आपत्ती ही कारणे याला असू शकतात, असे डाॅ. देशमुख म्हणाले.

१९९ जणांनी घेतले विषारी औषध
लिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील     एकूण
पुरुष      ८०     ७१     १५१
स्त्री          ३६    १२    ४८

२२४ जणांनी घेतला गळफास
लिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील     एकूण
पुरुष     ८२     ९२            १७४
स्त्री    ३६     १४     ५०

६१ जणांनी घेतले जाळून
लिंग :     ३० वर्षांखालील     ३१ वर्षांवरील      एकूण
पुरुष      १४     १८      ३२
स्त्री      ११    १८     २९

Web Title: 484 suicides in nine months in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.