परभणीत ४५ हजारांची घरफोडी

By Admin | Updated: February 27, 2016 00:26 IST2016-02-27T00:22:54+5:302016-02-27T00:26:58+5:30

परभणी : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी लोकमान्यनगर भागात एका घरातून सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोख २५ हजार रुपये लांबविले.

45,000 house-houses in Parbhani | परभणीत ४५ हजारांची घरफोडी

परभणीत ४५ हजारांची घरफोडी

परभणी : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी लोकमान्यनगर भागात एका घरातून सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोख २५ हजार रुपये लांबविले. ही घटना २६ फेब्रुवारीच्या पहाटे घडली.
लोकमान्यनगर भागात श्रीकांत वैद्य यांचे घर आहे. वैद्य यांच्या घरातील काही सदस्य परतूर येथे तर काही सदस्य तुळजापूर येथे मागील दोन दिवसांपूर्वी गेले होते. त्यांच्या घरात साळापुरकर कुटुंब भाड्याने राहते. २५ फेब्रुवारीच्या रात्री अंदाजे चार ते पाच चोरट्यांनी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास वैद्य यांच्या मुख्य घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दरम्यान, साळापूरकर यांच्या घराचे व आजूबाजूच्या अन्य दोन घरांना बाहेरुन कुलूप लावले. या कालावधीत चोरट्यांनी वैद्य यांच्या घरातून बेडरुममध्ये असलेल्या कपाटातून २५ हजार रुपये, ९ ग्रॅम सोने व अर्धा किलो चांदीचे जुने भांडे चोरुन नेले. दरम्यान, या घटनेनंतर वैद्य कुुटुंबिय शुक्रवारी सकाळी परतल्यावर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. श्वानाला पाचारण केले होते. श्वानाने रविराज पार्कपर्यंत चोरट्यांचा माग काढला. घटनास्थळी प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक बन्सल, पोलिस निरीक्षक जगताप, कापुरे, दळवी, वऱ्हाडे, खुपसे, सातपुते, रेड्डी यांनी भेट दिली.

Web Title: 45,000 house-houses in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.