शहरातील ४५ अतिक्रमणे हटविली !

By Admin | Updated: December 23, 2014 00:11 IST2014-12-23T00:11:00+5:302014-12-23T00:11:00+5:30

आशपाक पठाण , लातूर फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने निर्माण होणाऱ्या समस्यांना ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणताच मनपा आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली आहे़

45 encroachments in city deleted! | शहरातील ४५ अतिक्रमणे हटविली !

शहरातील ४५ अतिक्रमणे हटविली !


आशपाक पठाण , लातूर
फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने निर्माण होणाऱ्या समस्यांना ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणताच मनपा आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली आहे़ अतिक्रमण विभागात कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने कारवाईसाठी अडचण येत असल्याची ओरड वाढलेली असताना आयुक्तांनी आणखी ५ कर्मचारी दिले आहेत़ सोमवारी दयानंद गेटवरील ५० ते ६० जणांना फुटपाथवरून हटविण्यात आले आहे़
लातूर शहरात फुटपाथवर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व पादचाऱ्यांची गैरसोय वाढत चालली आहे़ अगोदरच अरूंद असलेल्या रस्त्यावरून पायी जात असताना पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच वागावे लागत आहे़ गेल्या वर्षभरापासून अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झाल्याने फुटपाथवर पक्की दुकाने तयार झाली आहे़ याबाबत लोकमतने ‘फुटपाथवर व्यावसायिकांचा ताबा’असे वृत्त शनिवारी प्रसिध्द केले़ त्यानंतर कोणत्या चौकात किती अतिक्रमणे आहेत याचे सर्वेक्षण करून रविवारी वृत्त प्रकाशित करताच मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी अतिक्रमण विभागाला ५ नवीन कर्मचारी दिले़ फुटपाथवर असलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावेत, अशा सूचना अतिक्रमण विभागाला दिल्या़ त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच अतिक्रमण हटविण्याबाबत तयारी करण्यात आली़ दुपारी १२ नंतर अतिक्रमण विभागाच्या पथकाने दयानंद गेटवर असलेल्या फुटपाथवरील दुकाने काढण्यास सुरूवात केली़ गेल्या अनेक दिवसांपासून पक्की दुकाने लावून बसलेल्या व्यावसायिकांनी आपली दुकाने काढून घेतली आहेत़ काही जणांनी पक्के दुकान काढून बाजूलाच हातगाडा लावून रस्त्यावर आपली मालकी कायम ठेवली आहे़ भाजीपाल्याचा मोठा बाजार भरत असल्याने याठिकाणी रात्रीच्या वेळी वजनकाटा व इतर साहित्य ठेवण्यासाठी पक्के दुकानदार भाडे घेत होते़ फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आलेल्या जवळपास १ हजार फुटाचा फुटपाथ रिकामा झाला आहे़ अतिक्रमण विभाग प्रमुख कलीम शेख म्हणाले, अतिक्रमण काढण्यासंदर्भात मनपा आयुक्तांनी कडक सूचना केल्या आहेत़ कर्मचारीही वाढवून दिले आहेत, एक वाहनही दिल्याने आता मोहिमेला गती आली आहे़ आयुक्तांच्या मार्गदर्शनात मोहिम तीव्र करण्यात आली आहे़ ४
मनपाच्या अतिक्रमण विभागात कर्मचारी वाढविण्यात आले आहेत़ त्यांना एक वाहनही दिले आहे़ त्यामुळे सोमवारी अतिक्रमण काढायला सुरूवात झाली आहे़ दयानंद गेट भागातील फुटपाथ रिकामा करण्यात आला आहे़ अतिक्रमण पक्के असो की कच्चे सगळेच अतिक्रमण हटविण्यात येतील़ सध्या तरी अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत़ ही मोहीम आता सुरूच राहणार असल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ ४
दरम्यान, गंजगोलाईतील कापड लाईन, भुसार लाईन भागातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे़ येथील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण विभागाने सोमवारी पाहणी केली आहे़
४प्रारंभी संबंधित अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात येणार आहे़ त्यानंतर रस्त्यावर वाहतूक व पादचाऱ्यास अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्यात येणार आहे़ व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घ्यावीत, मनपाकडून होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे़

Web Title: 45 encroachments in city deleted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.