रस्त्यांसाठी ४३ लाखांचा निधी

By Admin | Updated: May 28, 2014 00:26 IST2014-05-28T00:04:56+5:302014-05-28T00:26:48+5:30

कळंब : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत ताुलक्यातील १३ गावातील सिमेंट रस्ता कामांसाठी ४३ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़

43 lakhs funds for roads | रस्त्यांसाठी ४३ लाखांचा निधी

रस्त्यांसाठी ४३ लाखांचा निधी

 कळंब : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत ताुलक्यातील १३ गावातील सिमेंट रस्ता कामांसाठी ४३ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़ विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांच्या वस्त्यांमध्ये ही रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत़ शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तांडा वस्ती सुधार योजना राबविण्यात येते़ या योजनेतून विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांच्या वस्तीमधील विकास कामासाठी विशेष निधी देण्यात येतो़ या योजनेमधून अनेक विकासापासून वंचित असलेल्या वस्त्यांच्या विकासासाठी निधी मिळवून विकास कामे मार्गी लावली आहेत़ या गावांचा समावेश तालुक्यातील रांजणी, दहिफळ येथील वडरवस्ती, नायगाव येथील कैकाडी वस्ती, येरमाळा येथील वडरवस्ती, बांगरवाडी, देवधानोरा, उपळाई येथील वस्ती, चोराखळी, रांजणी, वडगाव (ज) येथील धनगरवस्ती, गोविंदपूर येथील भगवान वस्ती, आढाळा येथील धोंगडे वस्ती, दुधाळवाडी येथील भांगे वस्तीत ही कामे होणार आहेत. (वार्ताहर) गावनिहाय निधी बांगरवाडीसाठी ४ लाख, चोराखळी- ५ लाख, रांजणी - ४ लाख, उपळाई - ३ लाख, गोविंदपूर- २ लाख, आढाळा- २ लाख, वडगाव (ज) - २ लाख, दूधाळवाडी- ३ लाख, देवधानोरा - ४ लाख, रांजणी - ३ लाख, दहिफळ - ३ लाख, नायगाव - ४़९ लाख, येरमाळा येथे ४ लाख रूपये खर्च करून ही कामे करण्यात येणार आहेत़

Web Title: 43 lakhs funds for roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.