जिल्ह्यातील ४३ विविध सोसायट्या बिनविरोध
By Admin | Updated: February 13, 2015 00:49 IST2015-02-13T00:40:49+5:302015-02-13T00:49:40+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ३४५ पैकी १२ सोसायट्यांचा निवडणुका झाल्या़ तर ४३ सोसायट्या बिनविरोध आल्या आहेत.

जिल्ह्यातील ४३ विविध सोसायट्या बिनविरोध
लातूर : लातूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ३४५ पैकी १२ सोसायट्यांचा निवडणुका झाल्या़ तर ४३ सोसायट्या बिनविरोध आल्या आहेत.
दर पाच वर्षाला विविध सहकारी सोसायट्याच्या निवडणुका होतात़ यामध्ये काही निवडणुका तडजोडीने बिनविरोध काढल्या जातात़ तर काही सोसायट्याच्या निवडणुका निवडणूक प्रक्रियेद्वारे पूर्ण केल्या जातात़ यामध्ये एकूण ३४५ सोसायट्यांपैकी २६६ गावातील सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ तर १३० गावामध्ये विविध सहकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे़ एकूण विविध कार्यकारी सासट्यापैकी ४३ गावांतील सोसायट्या बिनविरोध काढण्यात आल्या आहेत़ तर १२ गावातील निवडणुका निवडणूक प्रक्रियेद्वारे पूर्ण झाले आहेत़ दहाही तालुक्यांतील सोसायट्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)