४३ कोटी १६ लाखांचे मुद्रांक धुळखात

By Admin | Updated: April 1, 2015 00:57 IST2015-04-01T00:51:21+5:302015-04-01T00:57:57+5:30

उस्मानाबाद : मुद्रांक खात्याने हजार रुपये आणि त्यावरील मुद्रांकांची विक्री थांबविल्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयात सध्या ६७ हजार १५८ एवढे मुद्रांक पडून आहेत

43 crore 16 lakh stamp duty | ४३ कोटी १६ लाखांचे मुद्रांक धुळखात

४३ कोटी १६ लाखांचे मुद्रांक धुळखात


उस्मानाबाद : मुद्रांक खात्याने हजार रुपये आणि त्यावरील मुद्रांकांची विक्री थांबविल्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयात सध्या ६७ हजार १५८ एवढे मुद्रांक पडून आहेत. याची किंमत ४३ कोटी १६ लाख ४७ हजार एवढी आहे. दरम्यान, १००आणि ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची विक्री सुरू आहे. एक हजारावरील स्टॅम्पची विक्री बंदअसल्याने नागरिकांना गैैरसोयीला तोंड द्यावे लागत अहे.
एक हजार रुपये आणि त्यावरील सर्व रकमेच्या स्टॅम्प पेपर छपाई, वितरण आणि विक्री थांबविण्याचा निर्णय मुद्रांक खात्याने २३ जानेवारी रोजी घेतला होता. याबाबत तसे पत्रही जिल्हा कोषागार कार्यालयात मिळाले आहे. त्यामुळे कार्यालयात असलेल्या मुद्रांकांचे करायचे काय? असा प्रश्न निमर्ण झालेला आहे. दरम्यान, सध्या खरेदीदाराला मुद्रांक शुल्क ‘आॅनलाईन’ भरावे लागत आहेत. खरेदीदस्त करणे किंवा बँकेचे गहाणखत करताना शासनाचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी भरण्यासाठी स्टॅम्प पेपर वापरले जात होते. दरम्यान, २३ जानेवारी २०१५ पासून १ हजार, ५ हजार, १० हजार, १५ हजार आणि २० हजारांच्या स्टॅम्पची विक्री बंद आहे. त्यामुळे आता खरेदीदाराला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आॅनलाईन भरण्याशिवाय नागरिकांना पर्याय नाही. मोठ्या रक्कमेचे स्टॅम्प विक्री बंद असल्याने सध्या शंभर व पाचशे रूपयांच्या स्टॅम्प पेपरला मोठी मागणी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 43 crore 16 lakh stamp duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.