४२ गावांना दूषित पाणीपुरवठा
By Admin | Updated: August 10, 2014 02:01 IST2014-08-10T01:56:27+5:302014-08-10T02:01:38+5:30
४२ गावांना दूषित पाणीपुरवठा

४२ गावांना दूषित पाणीपुरवठा
फकीरा देशमुख भोकरदन
भोकरदन तालुक्यात जुलै महिन्यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने १२८ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ४२ गावातील ४५ नमुने दूषित आढळून आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे कर्मचारी हे मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसल्याने गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या योजनेमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर होतो की नाही याकडे कोणाचेही लक्ष नाही. अनेक जलवाहिनी फुटलेल्या आहेत. त्यामुळे नालीचे पाणी त्याद्वारे नळाना येते. भोकरदन शहरासह ग्रामीण भागात हे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. जो पर्यंत एखाद्या गावाला साथीच्या आजराची लागण होत नाही तोपर्यंत कोणाचेही लक्षात हा प्रकार येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आरोग्य विभागाने जुलै महिन्यात तालुक्यातील आन्वा २५, धावडा १२, हसनाबाद १३, जळगाव सपकाळ ५, केदारखेडा २०, राजूर १८, पिंपळगाव रेणूकाई २५, वालसावंगी १० या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या एकूण १२८ ठिकाणचे पाणी नमुने घेतले. त्यापैकी वाकडी, पाडा, वाडी बु, मुठाड, आव्हाना, ठालेवाडी, दहिगाव, पोखरी, वडोदतांगडा, वाढोणा, पंढरपूरवाडी, तडेगाव, पिंपळगाव सुतार, टाकेवाडी, वाल्मीक नगर, नांजावाडी, बेलोरा, बंरजळा, केदारखेडा, जवखेडा ठोंबरी, कुंभारी, टाकळी, जानेफळ, राजूर, थिगळखेडा, पिंपळगाव बारव, बामखेडा, वालसा, कोळेगाव, बाभूळगाव, ताडकळस, पिंपळगाव रेणुकाई, वरूड, सिपोरा बाजार, बोरगाव, पारध खुर्द, पारध बु, या गावात घेण्यात आलेले पाणी नमुने दूषित आढळले आहेत़