जनरल स्टोअर फोडून ४१ हजार पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST2020-12-17T04:24:56+5:302020-12-17T04:24:56+5:30

भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दांपत्याला मारहाण औरंगाबाद: पत्नीला मारहाण करणाऱ्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या शेजारील दांपत्याला तिघांनी मारहाण करून जखमी ...

41,000 were looted from the general store | जनरल स्टोअर फोडून ४१ हजार पळविले

जनरल स्टोअर फोडून ४१ हजार पळविले

भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दांपत्याला मारहाण

औरंगाबाद: पत्नीला मारहाण करणाऱ्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या शेजारील दांपत्याला तिघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी पडेगावातील कासंबरी दर्गा येथे झाली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इरफान पठाण, नसीर पठाण आणि नुमान पठाण अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी त्याच्या पत्नीला मारहाण करीत असल्यामुळे घराशेजारील नाजमीन बेगम या त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून नाजमीन यांचा पती जावेद मयुद्दीन यांनी त्यांना जाब विचारला असता आरोपींनी त्यांना पाईपने मारहाण केली.

व्यापाऱ्याचा मोबाईल पळविला

औरंगाबाद: दुकानात काउंटरवर चार्जिंग करण्यासाठी ठेवलेला मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १० रोजी रात्री सिटी चौक परिसरात झाली. याप्रकरणी गुरुदीपसिंग छाबडा यांनी सिटी चौक ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: 41,000 were looted from the general store