विषप्रयोगातून औरंगाबादेत ४१ जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 05:47 IST2019-07-15T05:47:09+5:302019-07-15T05:47:15+5:30

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे अज्ञात व्यक्तींनी मुक्या जनावरांवर विषप्रयोग केल्याने गावात १ गाढव, ४० वराहांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

41 animal deaths in Aurangabad | विषप्रयोगातून औरंगाबादेत ४१ जनावरांचा मृत्यू

विषप्रयोगातून औरंगाबादेत ४१ जनावरांचा मृत्यू

उंडणगाव (जि. औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे अज्ञात व्यक्तींनी मुक्या जनावरांवर विषप्रयोग केल्याने गावात १ गाढव, ४० वराहांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
दरम्यान, दोन घोडे अत्यवस्थ असून या गैरकृत्यामुळे पशुपालक, वडार समाज व मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बसस्थानकाजवळील परिसरात कुणी तरी पिठात विष मिसळून फेकले होते. ते खाऊन जनावरांना विषबाधा झाली. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींना त्वरीत अटक करण्याची मागणी प्राणीमित्रांनी केली आहे.

Web Title: 41 animal deaths in Aurangabad