४ हजार विद्यार्थ्यांनी दिली सीईटी परीक्षा
By Admin | Updated: May 9, 2014 00:41 IST2014-05-09T00:40:43+5:302014-05-09T00:41:03+5:30
परभणी : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या वतीने बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्र्थ्यांची ८ मे रोजी एमएचसीईटी परीक्षा झाली़

४ हजार विद्यार्थ्यांनी दिली सीईटी परीक्षा
परभणी : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या वतीने बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्र्थ्यांची ८ मे रोजी एमएचसीईटी परीक्षा झाली़ यामध्ये परभणी जिल्ह्यात ३ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़ परभणी शहरात १२ केंद्रांवर ४ हजार १३ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते़ पैकी ३ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ यात ८८ विद्यार्थी अनुपस्थित होते़ ज्ञानोपासक महाविद्यालय ४८०, शिवाजी महाविद्यालय ५७६, शिवाजी विधी महाविद्यालय १९२, शिवाजी इंजिनिअरींग १९२, शिवाजी पॉलिटेक्नीक कॉलेज २४०, रावसाहेब जामकर विद्यालय ४५६, कमलताई जामकर विद्यालय २१६, शारदा महाविद्यालय २६४, शारदा विद्यालय २४०, बाल विद्या मंदिर ५२८, सारंग स्वामी विद्यालय २८८, मराठवाडा हायस्कूल ३४१ असे एकूण ४ हजार १३ परिक्षार्थ्यांचा समावेश होता़ (प्रतिनिधी)