बजाजनगर परिसरात ४ हजार जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:04 IST2021-04-07T04:04:12+5:302021-04-07T04:04:12+5:30
वाळूज महानगर : बजाजनगर परिसरात आतापर्यंत ४ हजार २२५ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. या परिसरात बजाजनगरातील प्राथमिक आरोग्य ...

बजाजनगर परिसरात ४ हजार जणांना लसीकरण
वाळूज महानगर : बजाजनगर परिसरात आतापर्यंत ४ हजार २२५ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. या परिसरात बजाजनगरातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जि.प.शाळा पंढरपूर, जि.प.शाळा बजाजनगर, त्रिमूर्ती बालक मंदिर, बजाजनगर, यशश्री विद्यालय सिडको वाळूज महानगर आदी ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंगळवारी ७०१ जणांनी कोरोनाची लस घेतल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे यांनी सांगितले.
----------------------------
वाळूजला कमी दाबाने वीज पुरवठा
वाळूज महानगर : वाळूजच्या शिवाजीनगर परिसरात मंगळवारी (दि.६) कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. कमी होल्टेजमुळे घरातील विद्युत उपकरणे बंद पडला. महावितरणकडून सुरळीत वीज पुरवठा केला जात नसल्याने ग्राहकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
------------------------
पंढरपुरात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी
वाळूज महानगर : पंढरपूरच्या भाजी मंडईत भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळत असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती वर्तविली जात आहे. या भाजीमंडईत दररोज सकाळी व सायंकाळी भाजीपाला खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत असतात. भाजी मंडईत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही.
------------------------
झाडे जगविण्यासाठी वृक्षप्रेमींचा पुढाकार
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील झाडे जगविण्यासाठी सह्याद्री वृक्ष बँकेचे पदाधिकारी व वृक्षप्रेमी पुढाकार घेऊन झाडे जगविण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने ही झाडे जगविण्यासाठी वृक्षप्रेमी टँकरने पाणी झाडांना देत आहेत. अनेकजण श्रमदान करून झाडांना पाणी देणे, झाडाची निगा राखणे आदी कामे स्वयंस्फूर्तीने करीत आहेत. पर्यावरणप्रेमींच्या पुढाकाराने सिडकोचा परिसर उन्हाळ्यात हिरवागार दिसत आहे.
---------------------------