शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारपेठेला ४०० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:38 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्यात शहरातील व्यवसायाचे आर्थिक नुकसान २७५ कोटींपर्यंत आहे.

ठळक मुद्देबंदचा परिणाम : शहरातील २७५ कोटींचे व्यवहार ठप्प; पेट्रोलपंप, हॉटेलसह विविध उद्योगांचा व्यवहार थांबला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्यात शहरातील व्यवसायाचे आर्थिक नुकसान २७५ कोटींपर्यंत आहे.मराठा समाजाच्या आंदोलनात व्यापारी स्वत:हून सहभागी झाले होते. बहुतांश व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचे शटर गुरुवारी उघडलेच नाही. याचा मोठ्या प्रमाणात फटका शहराला बसला. विशेषत: येथील हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, पर्यटनाच्या व्यवसायाला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला आहे. यासंदर्भात मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले की, शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील ९९ टक्के बाजारपेठ बंद होती. सरकारी तिजोरीत कर भरण्याच्या आकडेवारीचे गणित केल्यास जिल्ह्यातील बाजारपेठेत सध्या दररोज ४०० कोटींची उलाढाल होत आहे. या एकूण उलाढालीपैकी शहरातील व्यवसायाचा २५० ते २७५ कोटींचा वाटा असतो. जर एक दिवस बाजारपेठ बंद राहिली तर जिल्ह्यात ४०० कोटींचे व्यवहार ठप्प होतात. यात जाधववाडी, मोंढा, आॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, कपडा बाजार, सराफा बाजार यासारख्या व्यवसायाचा समावेश आहे.पेट्रोलपंपांचे ५ कोटींचे व्यवहार ठप्पगुरुवारी शहरातील व आसपासच्या परिसरातील ३५ पैकी ३० पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. या काळात अवघे ५ पेट्रोलपंप सुरू होते. मात्र, दुपारनंतर आंदोलनकर्त्यांनी यातील ३ पेट्रोलपंप बंद करायला भाग पाडले होते. सायंकाळी काहीच पेट्रोलपंप सुरू झाले होते. यासंदर्भात पेट्रोलपंपचालक असोसिएशनचे हितेश पटेल यांनी सांगितले की, पहिल्यांदाच शहरातील पेट्रोल कंपन्यांचे स्वत:चे पेट्रोलपंप बंद होते. शहरात दररोज ३ लाख लिटर पेट्रोल तर दोन लाख लिटर डिझेलची विक्री होते. व्यवस्थापनावरील खर्च, असे ५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.हॉटेल उद्योगाला फटकाऔरंगाबाद जिल्हा हॉटेल्स रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी मगर यांनी सांगितले की, आमच्या संघटनेचे १७२ सदस्य आहेत. तसेच अन्य मिळून शहरात लहान-मोठे २५० हॉटेल रेस्टॉरंट, लॉज आहेत. एका दिवसात दीड कोटीचा फटका या व्यवसायाला बसला आहे. बंदचा परिणाम येणारा आठवडाभर दिसून येईल.८०० कोटींचे बँकिंग व्यवहार ठप्पबँकेतील सुमारे ८०० कोटींचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती बँकेच्या अधिकाºयांनी दिली. चित्रपटगृहांनाही आर्थिक फटका बसला. यासंदर्भात चित्रपटगृहाचे मालक रवी खिंवसरा यांनी सांगितले की, शहरात मल्टिप्लेक्स व सिंगल चित्रपटगृहांचे २७ स्क्रीन आहेत. या चित्रपटगृहांतील सर्व शो रद्द करण्यात आले होते. त्यामुळे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. खाद्यपदार्थांपासून ते पार्किंगपर्यंत विविध व्यवसायालाही तेवढाच फटका बसला. असा एकूण ५० लाख रुपयांचा फटका बसला आहे.उद्योजकांच्या प्रतिक्रियाउद्योजकांत भीतीचे वातावरणनवीन उद्योग येत नाहीत. अशा घटना घडत असतील, तर येणारे नवीन उद्योगही येणार नाहीत. मोठे उद्योग गेले तर मराठवाड्यातील भूमिपुत्राचे छोटे उद्योग कसे चालतील. या घटनेमुळे संपूर्ण उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.-राहुल मोगले, उद्योजकउद्योगांना बंदमधून वगळावेऔरंगाबादच्या इतिहासात ही अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे उद्योजक आतून हादरले असून, त्यांचे मनोबल खालावले आहे. अशा घटना टाळण्यासाठी उद्योगाला बंदमधून वगळण्यात यावे.-अनिल पाटील, उद्योजकदरोड्याचे गुन्हे दाखल करावेतनियोजन करून कारखान्याची तोडफोड केली आहे. उद्योगाची सुरक्षा महत्त्वाची आहे. यात पोलीस कमी पडले. यात बाहेरचे लोक जास्त होते. तोडफोड करणाºया हल्लेखोरांवर पोलिसांनी दरोड्याचे गुन्हे दाखल करावेत.-विकास पाटील, उद्योजकनकारात्मक परिणामवाळूज औद्योगिक वसाहतीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान घडले आहे. या घटनेचा येथील औद्योगिक विकासावर नकारात्मक परिणाम होईल. ही जखम भरण्यास दीर्घकाळ जाईल.-बालाजी शिंदे, उद्योजकचुकीला माफी नाहीऔरंगाबाद शहर जगात बदनाम झाल्यामुळे गुतंवणूक करण्यास राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या दहा वेळा विचार करतील. याचा फटका मराठवाड्याचा विकासालाच बसणार आहे. चुकीला माफी नाही. दोषींना लवकर अटक झाली पाहिजे.-किरण जगताप, उद्योजकपोलिसांनी दबावाला बळी पडू नयेदोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे, पोलिसांनीही कोणाच्याही दबावाला बळी न पडता दोषींना अटक करावी. उद्योगांचा विकास होण्यासाठी आम्ही मागील काही दशकापासून प्रयत्नशील आहोत. अशा घटनांमुळे त्यास धक्का लागला आहे.-बी.एस. खोचे, उद्योजकतोडफोडीची चौकशी करावाळूज एमआयडीसीतील कंपन्यांची तोडफोडीचा निषेध येथील काही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे रिपोर्टिंग विदेशातील त्यांच्या मुख्यालयात होते. अशा घटनेमुळे चुकीचा संदेश जगात गेला आहे. या घटनेची सीबीआय चौकशी करावी. सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी. -नारायण पवार, उद्योजककामगारांची सुरक्षा धोक्यातमोठ्या उद्योगांनाच संरक्षण मिळत नाही. लघु उद्योगांना कसे मिळेल. उद्योजकांसाठी कामगारांची सुरक्षा महत्त्वाची असते. सुरक्षा असेल तर उद्योग टिकतील. अशा घटनांमुळे कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे.-आनंद पाटील, उद्योजकसरकारला कर देऊ नयेपायाभूत सुविधा नसताना उद्योग करावे लागत आहेत. सुरक्षित शहरात उद्योग सुरू करावा, असे वाटत आहे. सुरक्षितता सरकार जोपर्यंत देत नाही तोपर्यंत उद्योजकांनी सरकारला कर देऊ नये.-सुरेश खिल्लारे, उद्योजकउद्योग चालविणे कठीणआंदोलनाचा गैरफायदा घेत समाजकंटकांनी नियोजनपूर्वक हल्ला केला. जे उद्योजक रोजगारनिर्मिती करतात. लाखो लोकांचे संसार त्यावर चालतात. त्याच उद्योजकांच्या जिवावर उठण्याचा हा प्रकार अतिशय घृणास्पद आहे. संरक्षणाशिवाय उद्योग चालविणे कठीण आहे.-अर्जुन गायके, माजी अध्यक्ष, मसिआ

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादMarketबाजारagitationआंदोलन