शहरातील ४० टक्के मालमत्तांना करच नाही
By Admin | Updated: March 15, 2016 00:43 IST2016-03-15T00:43:20+5:302016-03-15T00:43:20+5:30
औरंगाबाद : शहरातील तब्बल ४० टक्के मालमत्तांना महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये मालमत्ता करच लावलेला नाही. त्यामुळे दरवर्षी महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

शहरातील ४० टक्के मालमत्तांना करच नाही
औरंगाबाद : शहरातील तब्बल ४० टक्के मालमत्तांना महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये मालमत्ता करच लावलेला नाही. त्यामुळे दरवर्षी महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. शंभर टक्के मालमत्तांना कर लावल्यास तब्बल ३५० कोटी रुपये मनपाला कर मिळेल, असा खळबळजनक अहवाल मनपा अधिकाऱ्यांनीच आयुक्तांना दिला आहे.
महापालिकेचा करमूल्य निर्धारण विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. या विभागात काम करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चढाओढ सुरू असते. ज्या मालमत्तांना लाखो रुपये कर लावायला हवा, त्या मालमत्तांना कर्मचारी फक्त हजारात कर लावून आपले खिसे भरतात. अनेक मालमत्ताधारकांना कर न लावताच कर्मचारी ‘तुपाशी’आणि मनपा उपाशी मरत आहे. मागील सहा महिन्यांपासून या विभागातील अनेक धक्कादायक बाबी समोर (पान २ वर)