४ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन आता आॅनलाईन
By Admin | Updated: January 6, 2015 01:06 IST2015-01-06T00:56:14+5:302015-01-06T01:06:48+5:30
जालना : सरकारी यंत्रणेतील प्रमुख कार्यालय म्हणून समजले जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील चार हजार कर्मचाऱ्यांचे वेतन आता आॅनलाईन पद्धतीने मिळणार असून

४ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन आता आॅनलाईन
जालना : सरकारी यंत्रणेतील प्रमुख कार्यालय म्हणून समजले जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील चार हजार कर्मचाऱ्यांचे वेतन आता आॅनलाईन पद्धतीने मिळणार असून त्यासाठी सर्व विभागातील प्रमुख कर्मचाऱ्यांना सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा परिषदेअंतर्गत सुमारे दहा हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये सहा हजार शिक्षकांची संख्या आहे. तर उर्वरीत चार हजार कर्मचाऱ्यांचे वेतन नेहमीप्रमाणे देयके तयार करून कोषागारातून बँकेकडे पाठवून होत होती. परंतु हे वेतन आॅनलाईन करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. त्यानुसार जानेवारी २०१५ पासूनच या घोषणेची अंमलबजावणी होत आहे.
पंचायत राज सेवार्थ प्रणालीद्वारे ग्रामसेवक, सामान्य प्रशासन, बांधकाम, सिंचन, आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. सोमवारी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात स्क्रीनवर प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांच्यासह विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)