४ ग्रॅम कुंडलासाठी कान कापला !

By Admin | Updated: January 20, 2017 00:16 IST2017-01-20T00:13:44+5:302017-01-20T00:16:03+5:30

लातूर : हणमंतवाडी परिसरात राहणाऱ्या नंदू तुकाराम दुधाळे यांना रिंगरोडवर अडवून त्यांचा कान कापून सोन्याचे ४ ग्रॅमचे कुंडल काढून घेतले व पोबारा केला.

4 g ears cut off for earrings! | ४ ग्रॅम कुंडलासाठी कान कापला !

४ ग्रॅम कुंडलासाठी कान कापला !

लातूर : हणमंतवाडी परिसरात राहणाऱ्या नंदू तुकाराम दुधाळे यांना रिंगरोडवर अडवून त्यांचा कान कापून सोन्याचे ४ ग्रॅमचे कुंडल काढून घेतले व पोबारा केला. ही घटना बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लातूर शहरातील हणमंतवाडी परिसरात राहणारे नंदू तुकाराम दुधाळे हे वायरमन म्हणून उदरनिर्वाह करतात. १८ जानेवारी रोजी बुधवारी ते सायकलवरून गांधी चौकाकडून येत असताना रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास एका मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडविले व मारहाण केली. त्यांच्या डाव्या कानात ४ ग्रॅम्
ा सोन्याचे कुंडल होते. ते काढून घेण्याचा प्रयत्न केला. तो दागिना निघत नाही हे लक्षात येताच चोरट्यांनी तीक्ष्ण हत्याराने दुधाळे यांचा कान कापून ४ ग्रॅमचे कुंडल घेऊन पोबारा केला. दरम्यान, विवेकानंद चौक पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून, दुधाळे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: 4 g ears cut off for earrings!