शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांच्या परीक्षा शुल्क माफीचा हिशेब विद्यापीठाला ३८ महाविद्यालये देईनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:30 IST

२० महाविद्यालयांनी परत केले ३० लाख; ३८ महाविद्यालयांचा प्रतिसाद मिळेना

छत्रपती संभाजीनगर : सन २०२३-२४ मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी ६३ महाविद्यालयांना १ कोटी ८६ लाख ८५ हजार १५१ रुपये निधी पाठविला होता. या निधीच्या उपयोगिता प्रमाणपत्र विभागीय उच्चशिक्षण विभागाने महाविद्यालयांना मागितले होते. त्यातील २५ महाविद्यालयांनी हिशोब दिला आहे. त्यात ५ महाविद्यालयांनी १०० टक्के रक्कम विद्यार्थ्यांना परत केली, तर २० महाविद्यालयांनी २९ लाख ९६ हजार २३५ रुपये शिल्लक राहिल्यामुळे उच्च शिक्षण विभागाला परत केला. त्याचवेळी ३८ महाविद्यालयांनी कोणताही हिशेब दिला नसल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ४ जिल्ह्यांतील अनेक भागांत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात दुष्काळ पडला होता. या भागातील कार्यरत ७४ महाविद्यालयांतील ३१ हजार ७१२ विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी २ कोटी ३८ लाख ३ हजार ६६६ रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. त्यातील ६३ महाविद्यालयांना १ कोटी ८६ लाख ८५ हजार १५१ रुपये एवढा निधी उच्चशिक्षण विभागाने एप्रिल २०२५ मध्येच वितरित केला. त्यानंतर उर्वरित ५० लाख रुपयांचा निधीही उपलब्ध झाला. या निधीचे वितरण करण्यापूर्वी तत्कालीन सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी पाठविलेल्या निधीच्या उपयोगिता प्रमाणपत्राची मागणी संबंधित महाविद्यालयास १ ऑगस्ट रोजी केली होती. त्यानुसार १४ नोव्हेंबरपर्यंत ६३ पैकी केवळ २५ महाविद्यालयांनी निधीचा हिशेब विभागीय सहसंचालक कार्यालयास पाठविला आहे. त्यात ५ महाविद्यालयांनी १०० टक्के निधीचे वितरण विद्यार्थ्यांना केले असून २० महाविद्यालयांनी शक्य तेवढ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचे पैसे परत केले आहेत. त्यात शिल्लक राहिलेले २९ लाख ९६ हजार २३५ रुपये विभागीय कार्यालयास धनादेशाद्वारे परत केल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरीत ३८ महाविद्यालयांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या निधीचा हिशोब देण्यास टाळाटाळ केल्याचेही स्पष्ट झाले.

महाविद्यालयांचा अनागोंदी कारभारविद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी ११२ महाविद्यालयांतील ८५ हजार ७६९ विद्यार्थ्यांसाठी ५ कोटी ५२ लाख ५२ हजार ७२० रुपयांचा निधी थेट उच्चशिक्षण संचालकांना मागितला होता. त्यावर उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी तत्कालीन सहसंचालक डॉ. निंबाळकर यांना पडताळणीचे आदेश दिले. त्यानुसार पडताळणी झाल्यानंतर केवळ ७४ महाविद्यालयांतील ३१ हजार ७१२ विद्यार्थीच पात्र ठरले. त्यात शासनाचे संस्थाचालकांकडे जाणारे तब्बल ३ कोटी १४ लाख ४९ हजार ५४ रुपये वाचले होते. पात्र ठरलेल्या महाविद्यालयांनीही निधी घेतल्यानंतर त्याचा हिशेब देण्यास टोलवाटोलवी सुरू केली आहे.

नोटीस पाठवली, संबंधितांची बैठक होणारदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचे पैसे संबंधितांना मिळालेच पाहिजेत. ज्या महाविद्यालयांनी प्राप्त निधीचा हिशेब दिला नाही. त्यांना नोटीस पाठविण्यात येईल. तसेच संबंधितांची स्वतंत्र बैठक घेऊन निधी उपयोगिता प्रमाणपत्र घेतले जाईल. अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.- डॉ. पंकजा वाघमारे, सहसंचालाक, उच्चशिक्षण विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : 38 colleges fail to account for drought-hit students' exam fee waivers.

Web Summary : 38 colleges yet to submit accounts for drought-affected students' exam fee refunds. Funds were allocated in 2023-24. Despite reminders, accountability remains pending. Notices to be issued.
टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर