नऊ वर्षांपासून ३६ लाभार्थी शौचालय अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:04 IST2021-04-05T04:04:52+5:302021-04-05T04:04:52+5:30
वासडी : गावात २०११-१२ मध्ये पूर्ण झालेल्या व्यक्तिगत शौचालय बांधकामाचे अनुदान गेल्या नऊ वर्षांपासून ३६ लाभार्थ्यांना मिळाले नसल्याचा धक्कादायक ...

नऊ वर्षांपासून ३६ लाभार्थी शौचालय अनुदानापासून वंचित
वासडी : गावात २०११-१२ मध्ये पूर्ण झालेल्या व्यक्तिगत शौचालय बांधकामाचे अनुदान गेल्या नऊ वर्षांपासून ३६ लाभार्थ्यांना मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ‘सरकारी काम, आणखी थोडे दिवस थांब’ या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव वासडी येथील लाभार्थ्यांच्या माथी आला आहे.
महाराष्ट्र ग्रामीण दलित वस्ती, पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत गावागावात शौचालय बांधकामास अनुदान दिले जात आहे. सुरुवातीला स्वखर्चातून बांधकाम केले जाते. त्यानंतर शासनाकडून अनुदान प्राप्त होते. वासडी येथील ३६ लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात सरपंच राहुल पाटणी यांनी अनुदान देण्यात यावे. यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठपुरावा केला. तरीदेखील प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. तब्बल नऊ वर्षांपासून लाभार्थी वंचितच आहेत. संबंधित विभागाने हे अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.