शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

संभाजीनगर नामकरणाचा ३४ वर्षांचा प्रवास; आता निर्णय केंद्राकडे, वाचा पुढील कायदेशीर प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 12:09 IST

३४ वर्षांपासून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याबाबतची राज्य सरकारच्या पातळीवरील पहिली पायरी पूर्ण झाली

औरंगाबाद : जिल्ह्याचे नामकरण औरंगाबादवरून ‘संभाजीनगर’ करण्याच्या जुन्या प्रस्तावाला आगामी महापालिका निवडणूक आणि शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. 

३४ वर्षांपासून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याबाबतची राज्य सरकारच्या पातळीवरील पहिली पायरी पूर्ण झाली असून, आता केंद्र शासनाच्या कोर्टात नामकरणाचा चेंडू गेला आहे. मनपाच्या सहा निवडणुका शिवसेना-भाजपने एकत्रितपणे २०१५ पर्यंत लढल्या. २०१९ ला युती तुटल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर या नामकरणावर भाजपने शिवसेनेवर वारंवार हल्लाबोल केला.

नामकरणाचा प्रवास असा...- १९८८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरण करण्याचा नारा दिला.

- १९९५ जूनमध्ये औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ हे नामकरण करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला.

- १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्यामुळे नामकरणाची अधिसूचना काढण्यात आली.

- १९९६ मध्ये मुश्ताक अहेमद यांनी औरंगाबादच्या नामकरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

- १९९९ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार गेले. नामकरणाचा प्रस्ताव पुढे सरकला नाही.

- २००२ मध्ये मुश्ताक अहेमद यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली निघाली.

- २००५ च्या सांस्कृतिक मंडळावरील मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील सभेत पुन्हा संभाजीनगरचा मुद्दा गाजला.

- २०१० मध्ये औरंगाबाद हवे की संभाजीनगर, याच मुद्द्यावर शिवसेना-भाजप युतीने महापालिका जिंकली.

- २०१४ मध्ये सेना-भाजप युती सत्तेत आल्यानंतर नामकरणाच्या प्रस्तावाला पुन्हा हवा मिळाली, परंतु निर्णय झाला नाही.

- २०१५ मध्ये हिंदुत्व, संभाजीनगर हे मुद्दे घेत निवडणुका, मात्र नामकरणाला बगल दिली गेली.

- ४ मार्च २०२० रोजी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणबाबतची न्यायालय याचिका, एनओसीबाबत शासनाने विभागीय प्रशासनाकडून माहिती मागविली.

- २०२१ मध्ये सुपर संभाजीनगर असा नारा देत शहरात डिस्पले (इल्युमिनेटेड लेटर्स) लावले. तसेच पालकमंत्र्यांनी जाहीरनामा प्रकाशित केला, सरकारी दौऱ्यात संभाजीनगर छापून आल्याने वादाला तोंड.

- ८ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी समृध्दीनंतरच नामकरण करण्याचा विचार जाहीर सभेत व्यक्त केला.

- २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर राज्य सरकार अल्पमतात येण्याची प्रक्रिया सुरू झाली.

- २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला.

आता पुढे काय होणार; एखाद्या शहराच्या नामांतराची कायदेशीर तरतूद अशी :- एखाद्या शहराचं अथवा गावाचं नाव बदलायचं असेल, तर त्यासाठी आधी राज्य सरकारला प्रस्ताव तयार करून, तो मंजूर करून घ्यावा लागतो. तो प्रस्ताव नंतर केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडे पाठवावा लागतो. केंद्रीय गृहमंत्रालयाचे तत्कालीन उपसचिव सरदार फत्तेसिंग यांनी १९५३ साली या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. - २००५ साली या तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली. या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे केंद्रातील सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया, रेल्वे, पोस्ट, आयबी इ. केंद्रीय संस्थांशी अशा प्रस्तावासंदर्भात विचारविनिमय करण्यात येतो व त्यांची ना हरकत प्राप्त झाल्यानंतर, केंद्रीय गृहखाते या प्रस्तावाला मंजुरी देते. - त्यानंतर, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून शहराचे नाव बदलण्यात येते, अशी माहिती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील ॲड.देवदत्त पालोदकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा