३२ टन कचरा उचलला

By Admin | Updated: August 1, 2014 00:29 IST2014-08-01T00:16:01+5:302014-08-01T00:29:16+5:30

जालना : शहरातील स्वच्छतेसाठी ३१ जुलैपासून जिल्हाधिकारी ए. एस.आर. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीमेस प्रारंभ करण्यात आला.

32 tons of garbage picked up | ३२ टन कचरा उचलला

३२ टन कचरा उचलला

जालना : शहरातील स्वच्छतेसाठी ३१ जुलैपासून जिल्हाधिकारी ए. एस.आर. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी शहरातील ३२ टन कचरा सारवाडी रोडवरील डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात आला.
या मोहिमेत एकूण १७ जवान, १२ वाहन चालक, ११४ पुरूष कामगार, ९५ महिला कामगार, व ६४ खाजगी कामगार असे एकूण ३०२ कर्मचारी कामाला लावण्यात आले. सकाळी ६ वाजेपासून मोहिमेस सुरूवात करण्यात आली होती. यात जुना जलना भागातील चंदनझिरा, संजयनगर, भवानीनगर परिसरातील नाल्यांची सफाई करून कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
या मोहिमेची उपजिल्हाधिकारी माचेवाड, नगराध्यक्षा पावर्ताबाई रत्नपारखे, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी पाहणी करून मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेवक चव्हाण, दाभाडे, जाधव, सतकर, उपमुख्याधिकारी मुखेडकर, कानपूडे, नगर अभियंता वाघमारे, स्वच्छता निरीक्षक डि. टी. पाटील, पंडीत पवार, संजय खर्डेकर, राजू मोरे, कारभारी तायडे, अशोक लोंढे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
मोहिमेत ३०२ कर्मचारी
या माहिमेच एकूण १७ जवान, १२ वाहन चालक, ११४ पुरूष कामगार, ९५ महिला कामगार, व ६४ खाजगी कामगार असे एकूण ३०२ कर्मचारी कामाला लावण्यात आले. सकाळी ६ वाजेपासून मोहिमेस सुरूवात करण्यात आली होती. संपूर्ण शहरात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: 32 tons of garbage picked up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.