बोरगाव बाजार येथे ३२ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:06 IST2021-02-05T04:06:56+5:302021-02-05T04:06:56+5:30

बोरगाव बाजार : येथे राजमाता जिजाऊ व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

32 people donated blood at Borgaon Bazaar | बोरगाव बाजार येथे ३२ जणांनी केले रक्तदान

बोरगाव बाजार येथे ३२ जणांनी केले रक्तदान

बोरगाव बाजार : येथे राजमाता जिजाऊ व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३२ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख दत्ता चव्हाण, पंचायत समिती सदस्य सत्तार बागवान, रामनाथ भोजने, किशोर भिसे, कृष्णा चव्हाण, इरफान शहा, राहुल कापुरे, काशिनाथ मोरे, संदीप चव्हाण, दीपक बिडवे, श्याम राजपूत, सुनील वानखेडे, किरण चव्हाण, नंदू जयस्वाल यांची उपस्थिती होती. दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनासाठी परिश्रम घेतले. कर्मचारी प्रशांत चिटणीस, आजिनाथ बडक, सुभाष तांबोळी, श्वेता जोशी, राधा गवारे, अनिता नागरकर, शिवाजी देशमुख, विजय पैठणकर आदींची उपस्थिती होती.

फोटो : बोरगाव बाजार येथे आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदान करताना शिवसैनिक.

Web Title: 32 people donated blood at Borgaon Bazaar