शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

आगीत ३२ लाखांचे नुकसान

By admin | Updated: March 27, 2015 00:30 IST

पानगाव : येथील व्यंकटेश कॉटन उद्योगातील रूईला गुरुवारी सकाळी ८़३० च्या सुमारास अचानक आग लागल्याने ३२ लाखांचे नुकसान झाले आहे़

पानगाव : येथील व्यंकटेश कॉटन उद्योगातील रूईला गुरुवारी सकाळी ८़३० च्या सुमारास अचानक आग लागल्याने ३२ लाखांचे नुकसान झाले आहे़ अग्निशमन दल व कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आणणे शक्य झाले़ रेणापूर तालुक्यातील पानगाव या गावालगत व्यंकटेश कॉटन उद्योग आहे़ गुरूवारी सकाळपासूनच जिनिंगमध्ये कापूस जीन करण्याचे काम सुरू झाले होते़ जिनिंगमधील कापसाच्या पाला गोडाऊनमधील रूईला सकाळी ८़३० च्या सुमारास अचानक आग लागली़ पाला हाऊसमध्ये ठेवलेल्या रूईच्या १०० गोणीसह १५० क्विंटल रूई आगीत भस्मसात झाल्या. दरम्यान, अचानक उष्णता वाढल्याने आणि धुराचे लोळ पसरू लागल्याने उद्योगातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तेव्हा आग लागल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे कर्मचाऱ्यांनी धावपळ करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला़ दरम्यान, लातुरातील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले़ हे अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले़ या आगीत जवळपास ३२ लाखांचे नुकसान झाले आहे़ आग आटोक्यात आणताना काही कर्मचाऱ्यांच्या हाताला इजाही झाली आहे़ त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत़ आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नसल्याचे उद्योगाचे मालक व्यंकटेश चव्हाण यांनी सांगितले़ (वार्ताहर)पानगाव येथील कॉटन उद्योगातील रूईला आग लागल्यामुळे ३२ लाखांचे नुकसान झाले. व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखविल्यामुळे तात्काळ आग आटोक्यात आली. तरीही ३२ लाखांचे नुकसान झाले. अग्निशमन दल व कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, आग आटोक्यात आणताना काही कर्मचाऱ्यांना इजाही झाली आहे.