शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ३२ लाख हेक्टर शेती पाण्यात; नुकसानभरपाई अडकली बँकेच्या केवायसीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:45 IST

शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतरच मिळणार नुकसानीची मदत

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ३१ लाख ९८ हजार ४६७ हेक्टर शेती सध्या पाण्यात आहे. त्यातील २३ लाख ६० हजार ३६८ हेक्टवरील नुकसानीचे पंचनामे झाले असून, १८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी शासनाने दिलेल्या १५०० कोटींच्या नुकसानभरपाईचे वाटप प्रशासकीय पातळीवर सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन केवायसी केल्यानंतरच भरपाई मिळेल, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

आयुक्त पापळकर म्हणाले, मागील २ दिवस पावसाचे मोठे संकट होते. सध्या पाऊस थांबला आहे. पुढील ४ दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असा दावा आयुक्तांनी केला.

आतापर्यंत १५०० कोटींपेक्षा अधिक मदतनिधी आला असून, याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. व्हीकेएन नंबर याद्या गावनिहाय प्रसिद्ध होतील. १८ व २३ सप्टेंबर रोजी दोन आदेशानुसार १५०० कोटी आले आहेत. जून, जुलै, ऑगस्टमधील नुकसानीची ही मदत आहे. शेतकऱ्यांना बँकेत जावे लागेल. शेती व शेतकरी यामध्ये वारंवार बदल होतात, त्यामुळे केवायसी बंधनकारक आहे. बँकांनी कुठल्याही कर्जाच्या हप्त्याची कपात करून घेऊ नये, हा मदतनिधी आहे. जर ऑटो पे असा नियम काही बँकांचा असेल तर तेथे शेतकऱ्यांनी अर्ज देऊन रक्कम कपात करू नये, असे सांगावे. मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रांचे पथक येणार आहे का, याबाबत विचारले असता विभागीय आयुक्तांनी अद्याप तरी पथक येण्याबाबत माहिती प्राप्त नसल्याचे नमूद केले. यावेळी अपर आयुक्त खुशालसिंग परदेशी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची उपस्थिती होती.

२४ हजार ७०० लोकांचे स्थलांतरणजायकवाडीतील विसर्गामुळे प्रशासकीय यंत्रणेने २४ हजार ७०० लोकांचे स्थलांतरण केले. १७ हजार ७८५ निवारागृहात आहेत, तर ६ हजार ७८१ घरी पोहोचले आहेत. सध्या पुरात कुणीही अडकलेले नाही. विभागात इंटरनेट, वीज पुरवठ्याबाबत धाराशिव, लातूरमधून काही तक्रारी होत्या, असेही आयुक्तांनी सांगितले.कोणत्या जिल्ह्यात किती शेती पाण्याखाली?जिल्हा......................................शेती हेक्टरमध्ये

छत्रपती संभाजीनगर.....................२३६५२८जालना...............................२३२०८२

परभणी...............................२७३०३३हिंगोली.....................................२७३४१३

नांदेड..................................६५४४०१बीड.................................६७५८९१

लातूर.............................४०३४३८धाराशिव.....................४४९६८१

एकूण.......................३१९८४६७

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Farms Submerged; Compensation Stuck in Bank KYC

Web Summary : Marathwada's 32 lakh hectares of farmland are underwater. Compensation distribution is underway, but farmers need KYC updates. 1500 crore rupees allocated for losses in June, July and August. 24,700 people were displaced due to flooding.
टॅग्स :Rainपाऊसfloodपूरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर