पीकविमा भरण्यासाठी ३० जूनची अंतिम मुदत
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:18:30+5:302014-06-14T01:20:47+5:30
नांदेड : तालुक्यातील सर्व गावांचा खरीप हंगाम- २०१४ हवामान आधारित पीकविमा योजनेत समावेश केला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे,

पीकविमा भरण्यासाठी ३० जूनची अंतिम मुदत
नांदेड : तालुक्यातील सर्व गावांचा खरीप हंगाम- २०१४ हवामान आधारित पीकविमा योजनेत समावेश केला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एम. टी. गुट्टे यांनी केले आहे.
या वर्षातील खरीप हंगामापासून विमा योजना राबविण्यात येत असून मूग, उडीद, सोयाबीनसह कापूस या पिकांचा समावेश केलेला आहे.पीक पेरल्यापासून पीक तयार होण्याच्या कालावधीत अपुरा पाऊस, पावसात खंड, अतिवृष्टी यापासून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येत आहे.
सदर योजनमध्ये कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना भाग घेता येणार असून विमा भरण्याची अंतिम मुदत ३० जून २०१४ आहे. शेतकऱ्यांनी प्रतिहेक्टरी कापसासाठी ९५० रुपये, सोयाबीन ९२३ रुपये, उडदासाठी ७५६ तर मुगासाठी ६१२ रुपये भरावयाचे आहेत. (प्रतिनिधी)