३०५५ उद्योगांचे प्रस्ताव रखडले
By Admin | Updated: August 14, 2014 01:57 IST2014-08-14T01:39:08+5:302014-08-14T01:57:28+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील गरजुंना रोजगार मिळावा म्हणून उद्योग केंद्र कार्यरत आहे़ त्यानुसार या केंद्राकडे ३ हजार ४१८ जणांनी

३०५५ उद्योगांचे प्रस्ताव रखडले
बाळासाहेब जाधव , लातूर
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील गरजुंना रोजगार मिळावा म्हणून उद्योग केंद्र कार्यरत आहे़ त्यानुसार या केंद्राकडे ३ हजार ४१८ जणांनी लघु उद्योगाची नोंदणी केली़ परंतु, या उद्योजकांनी आपला प्रकल्प अहवाल दिलेल्या कालावधीत बँकेकडे सादर केला नसल्यामुळे ३०५५ सर्व लघुउद्योगाचे प्रस्ताव रद्द होण्याची शक्यता आहे़
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने २०१२-१३ मध्ये अस्थाई उद्योगामध्ये सुक्ष्म उद्योग - २३२५, लघु उद्योग - ३२८, मध्यम - ३ तर स्थाई उद्योगामध्ये सुक्ष्म उद्योग - ६०, लघु - १७, अशा एकूण २६५६ उद्योगाचे प्रस्ताव दाखल झाले होते़ यापैकी ७७ उद्योग सुरू होवून स्थाई उद्योगामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला़ २०१३-१४ मध्ये अस्थाई उद्योगामध्ये सुक्ष्म उद्योग ६५८, लघुउद्योग -१०६, मध्यम-१ तर स्थाई उद्योगामध्ये सुक्ष्म- २५७, लघु उद्योग-२८ व मध्यम-१ यामध्ये एकूण ७६५ उद्योगांपैकी २८६ उद्योग स्थाई स्वरूपात आले आहेत़ यामध्ये एकूण ३ हजार ४१८ उद्योगांच्या प्रस्तावांपैकी दोन वर्षांच्या कालावधीत ३६३ प्रस्तावांना स्थाई स्वरूप आले आह़े तर उर्वरित उद्योगांचे प्रस्ताव मात्र जिल्हा उद्योग केंद्राने आमन्य केले आहेत़ दोन वर्षांच्या कालावधीत बँकेला प्रकल्प अहवाल आणि अन्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते़ परंतू या उद्योजकांनी प्रकल्प अहवाल सादर केला नाही़ त्यामुळे त्यांचे प्रस्ताव रद्द होण्याच्या मार्गावर आहेत़ परिणामी, उद्योग क्षेत्राला घरघर लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू व सुशिक्षीत बेरोजगारांना जिल्ह उद्योग केंद्राच्या माध्यमातून लघू उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे़ उद्योजक बनणाऱ्या व्यक्तीला प्रस्ताव व प्रकल्प अहवाल बँकेला सादर करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी दिला जातो़परंतू दिलेल्या कालावधीत कागदपत्राची पूर्तता न केल्यास लघुउद्योगासाठी दाखल करण्यात आलेले प्रस्ताव लॅप्स केले जात असल्याची माहिती जिल्ह उद्योग केंद्राचे जिल्ह महाव्यवस्थापक बी़त्री़यशवंते यांनी दिली़