३० नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे दाखल

By Admin | Updated: August 8, 2014 00:29 IST2014-08-07T23:51:41+5:302014-08-08T00:29:12+5:30

शिरूर अनंतपाळ : बोगस बी- बियाणे आणि खतांमुळे शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, म्हणून तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समितीच्या कृषी

30 samples are taken to the laboratory for inspection | ३० नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे दाखल

३० नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे दाखल



शिरूर अनंतपाळ : बोगस बी- बियाणे आणि खतांमुळे शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, म्हणून तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने खते आणि बियाणे यांच्या दुकानाची संयुक्त तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, ३० नमुने तपासणीसाठी गुणवत्ता प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
शिरूर अनंतपाळ शहरासह तालुक्यातील विविध गावांत २४ पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्र आहेत़ खते, बियाणे त्याचबरोबर किटकनाशके यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यातून शेतकऱ्यांची फसगत होऊ नये यासाठी तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समिती कृषी विभाग यांच्या वतीने संयुक्त तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी डी.बी. सुतार आणि पंचायत समिती कृषी अधिकारी एस.बी. आडे यांनी सर्वच दुकानांतील नमुने घेण्यास सुरुवात केली आहे.
शहरासह तालुक्यातील दैठणा, साकोळ, येरोळ, उजेड, थेरगाव, हिप्पळगाव आदी गावांतील किटकनाशकाचे पाच, रासायनिक खताचे नऊ, तर बियाणाचे सोळा असे एकंदर तीस नमुने काढून परभणी आणि पुणे येथील गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.गुणवत्ता तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल अप्रमाणित स्वरुपाचा मिळाला तर संबंधित कंपनीच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे एस.बी. आडे यांनी सांगितले.

Web Title: 30 samples are taken to the laboratory for inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.