महसूल विभागाच्या ३० लिपिकांना पदोन्नती
By Admin | Updated: June 9, 2014 01:12 IST2014-06-09T00:34:06+5:302014-06-09T01:12:20+5:30
नांदेड :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील ३० कर्मचाऱ्यांना अव्वल कारकूनपदी पदोन्नती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत़

महसूल विभागाच्या ३० लिपिकांना पदोन्नती
नांदेड :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील ३० कर्मचाऱ्यांना अव्वल कारकूनपदी पदोन्नती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत़ विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीनंतर हे आदेश काढले आहेत़
पदोन्नत लिपिकांना पदोन्नतीपदी रूजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश कार्यालयप्रमुखांना दिले आहेत़ कार्यमुक्त झाल्यानंतर पदोन्नतीच्या ठिकाणी रूजू न झाल्यास संबंधितांचे नाव निवडसूचितून कमी करण्याचा इशाराही दिला आहे़ अव्वल कारकूनपदी पदोन्नती मिळालेल्या लिपिकांमध्ये आऱएऩ ठाकूर, शुभांगी जोशी, व्ही़बी़ राठोड, आऱआऱ सावते,एस़एस़ हाके, विक्रम देगावकर, गणेश मोहिजे, नंदा औघे, कल्पना जुरावाड, प्रेमानंद लाठकर, एम़एम़ डांगे, सतीश कदम, एस़एच़ माडजे, व्ही़व्ही़ चौधरी, संजय गोडबोले, एऩपी़ अभंगे, जी़ एऩ धसकनवार, उमाकांत गोणे, अण्णाजी डुमने, शिवशंकर पवार, व्ही़बी़ खानसोळे, डी़बी़ कुलकर्णी, व्ही़ए़ खडसे, कैलास कांबळे, योगिता राठोड, प्रवीण जाधव, देवीदास जाधव, एमक़े़ देमगुंडे आणि डी़आऱ पोकले यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)