नामांकीत शाळेत मोफत प्रवेशासाठी ३० खोटे भाडे करारनामे, चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:06 IST2020-12-31T04:06:06+5:302020-12-31T04:06:06+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात खोटे भाडेकरारनामे करुन आरटीईचे प्रवेश घेतले गेले आहेत, अशा ३० भाडेकरारनाम्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ...

नामांकीत शाळेत मोफत प्रवेशासाठी ३० खोटे भाडे करारनामे, चौकशीची मागणी
औरंगाबाद : जिल्ह्यात खोटे भाडेकरारनामे करुन आरटीईचे प्रवेश घेतले गेले आहेत, अशा ३० भाडेकरारनाम्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आरटीई पालक संघाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्या अंतर्गत प्रवेशासाठी सोडत झाल्यावर पालक शाळेच्या जवळच्या एक किलोमिटर अंतरातील खोटा पत्ता टाकून आयसीएससी व सीबीएससी शाळेत मोफत प्रवेश मिळवत आहे. नामांकित शाळेत गौडबंगाल करुन मोफत प्रवेश मिळवलेल्या अशा ३० जणांच्या भाडेकरारनाम्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालक संघाने केली आहे.
पुणे आणि कोल्हापूर येथे रजिष्ट्री कार्यालयात भाडेकरारनामे केल्यानंतर त्याची माहीती मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांना दिली जाते. तसे औरंगाबादमध्ये होताना दिसत नाही. तसेच आरटीई प्रवेशाचा शाळांना दिला जाणारा निधी प्रवेशापासून सहा महिन्यांच्या आत मिळावा. जवाहर नवोदय आणि सैनिकी स्कुलचा प्रवेश अर्ज करतानाच सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे लागण्याची प्रक्रीया उत्तरप्रदेशात आहे. तशीच पद्धत आपल्याकडे लागू व्हावी, अशी मागणी आरटीई पालकसंघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यलयाकडून शिक्षण विभागाला हे पत्र कार्यवाहीस्तव पाठवण्यात आल्याचे साठे यांनी सांगितले.