२० रूग्णवाहिकांसह ३० डॉक्टर जिल्ह्यात
By Admin | Updated: May 12, 2014 00:01 IST2014-05-11T23:49:26+5:302014-05-12T00:01:07+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील रूग्णांना जोखमीच्या वेळी अत्यावश्यक सेवा तातडीने मिळण्यासाठी आता जिल्हा रूग्णालयाच्या मदतीला १० रूग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

२० रूग्णवाहिकांसह ३० डॉक्टर जिल्ह्यात
हिंगोली : जिल्ह्यातील रूग्णांना जोखमीच्या वेळी अत्यावश्यक सेवा तातडीने मिळण्यासाठी आता जिल्हा रूग्णालयाच्या मदतीला १० रूग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. सोबतच ३० डॉक्टर आणि २५ चालकही मिळणार आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागात कामी पडणार्या या रूग्णवाहिका अद्ययावत ठेवण्यात येणार आहेत. दुर्गम ठिकाणाहून गरजू रूग्णांना घेऊन तातडीने रूग्णालयात जाता यावे, यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य केद्रास रूग्णवाहिका देण्यात येणार आहेत. रूग्णांसाठी दिलेला १०८ टोलफ्री क्रमांक दाबताच रूग्णाहिका घटनास्थळी डॉक्टरांसह दाखल होणार आहे. एका रूग्णवाहिकेत २ डॉक्टर मिळून एकूण २० डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यातील १० पैकी ३ रूग्णवाहिकेत अॅडव्हॉन्स लाईफ सर्व्हीस बसविण्यात आली आहे. अन्य दोन रूग्णवाहिका अत्यावश्यक सेवासुविधासाठी राहणार आहेत. महत्वाच्या रूग्णालयात या रूग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. सर्व गरजू रूग्णांसाठी या रूग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावणार आहेत. गरोदर माता, अपघात आणि इमरजन्सी रूग्णांसाठी या रूग्णवाहिका कामी पडणार असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी) अॅम्ब्युलन्सची सुविधा जिल्हा सामान्य रूग्णालय २, उपजिल्हा रूग्णालय-वसमत, ग्रामीण रूग्णालय-औंढा नागनाथ, ग्रामीण रूग्णालय-कळमनुरी, ग्रामीण रूग्णालय-सेनगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र-आखाडा बाळापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र- गोरेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र-साखरा, प्राथमिक आरोग्य केंद्र-हट्टा येथे ही सुविधा मिळेल.