शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

३ तहसीलदार अपडेट्; ७ जणांचे आदेशाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: March 26, 2015 00:56 IST

बाळासाहेब जाधव ,लातूर जिल्ह्यात गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या वाळू व खडी केंद्र चालविणाऱ्या माफियांविरूध्द कारवाईची मोहीम सुरू केली आहे़

बाळासाहेब जाधव ,लातूरजिल्ह्यात गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या वाळू व खडी केंद्र चालविणाऱ्या माफियांविरूध्द कारवाईची मोहीम सुरू केली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी कारवाई केल्यामुळे सर्वच तहसीलदारांची झाडाझडती केली. त्यामुळे जळकोट, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तहसीलदारांनी काही प्रमाणात दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे तसेच थकबाकी असतानाही खडी केंद्र सुरू ठेवणाऱ्या खडी केंद्रांना सील ठोकण्याचे काम सुरू आहे़ परंतु इतर सातही तालुक्यातील तहसीलदारांनी मात्र अजूनही झोपेचे सोंग घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे चक्क दुर्लक्ष केले आहे.गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या वाळूमाफियांविरूध्द कारवाईची मोहीम सुरू केली आहे़ गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या माफियांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे अवैध गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या ९१२ जणांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून ७० लाख ३८ हजार १६१ रूपयाचा दंड वसूल केला आहे़ यामध्ये किरकोळ वाळू वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून मुख्य गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या माफियांकडे दुर्लक्ष केले असल्याचे आढळून आलेले आहे़ तसेच २०१४-१५ साठी लातूर जिल्ह्याला २० कोटी ३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १४ कोटी ३८ लाख ३ हजार ७३९ रूपयांचा दंड वसूल आहे़ उर्वरीत ६ कोटींच्या वसुलीसाठी ३१ मार्चची डेड्लाईन दिली आहे. फक्त तीन तालुक्यांच्या तहसीलदारांनी कारवाईला गती दिली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जळकोटमध्ये एका खडी केंद्रवाल्याकडून दोन लाख रूपये व बंद असलेल्या एका खडी केंद्राकडून १ लाख रूपयाचा दंड वसूल केला. देवणी तालुक्यातील पाच खडीकेंद्राकडून प्रत्येकी ५ लाख रूपये या प्रमाणे २५ लाख रूपये वसूल केले. तर वाळूतून ४ लाखांचा दंड असे एकूण २९ लाख रूपये वसूल केले आहेत़